माळशिरस नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी सौ. ताई सचिन वावरे यांची बिनविरोध निवड होणार औपचारिकता बाकी आहे….
माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य तुकाराम भाऊ देशमुख गटाच्या व माजी नगराध्यक्ष डॉ. अप्पासाहेब देशमुख यांच्या भगिनी सौ. ताई वावरे यांना सर्वात तरुण बिनविरोध नगराध्यक्ष होण्याचा बहुमान मिळाला.
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस नगरपंचायतीचे नगराध्यक्ष शिवाजीराव देशमुख यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या नगराध्यक्ष पदासाठी बिनविरोध नगरसेविका सौ. ताई सचिन वावरे यांनी नगराध्यक्षपदासाठी माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य व नगरपंचायत गटाचे नेते तुकाराम भाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारी अर्ज माळशिरस नगरपंचायत निवडणूक निर्णय अधिकारी विना पवार यांच्याकडे दाखल केलेला आहे. त्यांच्या नगराध्यक्ष पदाच्या अर्जावर रघुनाथ चव्हाण व कैलास वामन यांनी सूचक व अनुमोदक म्हणून सह्या केलेल्या आहेत. यावेळी तुकारामभाऊ देशमुख, नगरसेवक रघुनाथ चव्हाण, कैलास वामन, प्रवीण केमकर, सचिन आप्पा वावरे, सुरेशआबा वाघमोडे, सचिन टेळे, आप्पासाहेब टेळे, सर्जेराव घोडके, संजय जमदाडे, विजय भोकपडे, संभाजी वाघमोडे, संदीप पांढरे, रामभाऊ देशमुख, महेश वावरे, चैतन्य सर्जे, उमाकांत सर्जे, सचिन ढेरे, अमोल चौरे, श्रीपाद नायकुडे, सुरज देवकते, बाळासाहेब तरडे, ओंकार वावरे आदी उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. सौ. ताई सचिन वावरे यांचा एकमेव अर्ज आलेला असल्याने बिनविरोध नगराध्यक्षपदी निवड होणार आहे, फक्त औपचारिकता बाकी राहिलेली आहे. दि. 08/05/2024 रोजी निवडणूक निर्णय अधिकारी अधिकृत घोषणा करतील. माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य तुकाराम भाऊ देशमुख गटाच्या व माजी नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख यांच्या भगिनी सौ. ताई सचिन वावरे यांना सर्वात तरुण बिनविरोध नगराध्यक्ष होण्याचा बहुमान मिळालेला आहे.
माळशिरस नगरपंचायतीच्या निवडणुकीत अटीतटीच्या लढतीत वार्ड क्र. २ मधून सौ. ताई सचिन वावरे बिनविरोध अपक्ष नगरसेविका झालेल्या होत्या. नगराध्यक्ष पदाच्या निवडी वेळी डॉ. आप्पासाहेब देशमुख व तुकाराम भाऊ देशमुख यांचे दोन्ही गट एकत्र येऊन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाच्या निवडी पार पडलेल्या होत्या. तुकाराम भाऊ देशमुख गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या कालावधीत शिवाजीराव देशमुख यांच्याकडे काही महिन्याचा कालावधी नगराध्यक्ष पदाचा होता. त्यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्यानंतर सौ. ताई सचिन वावरे यांना बिनविरोध नगराध्यक्ष होण्याचा बहुमान मिळालेला आहे. माळशिरस नगरपंचायत हद्दीत वावरे यांचे कुटुंब आहे. तुकाराम भाऊ देशमुख गटामध्ये आहेत मात्र, सौ. ताई वावरे माजी नगराध्यक्ष डॉक्टर आप्पासाहेब देशमुख यांच्या भगिनी असल्याने दोन्ही गटाकडून वावरे यांना राजकीय सहकार्य मिळालेले असल्याने माळशिरस तालुक्याच्या इतिहासामध्ये पूर्वी कधीही घडलेले नाही व भविष्यात कधीही असे घडेल अशी राजकारणामध्ये वावरे कुटुंबांना संधी एकनिष्ठेचे फळ म्हणून मिळालेली आहे. बिनविरोध नगरसेविका होण्याचा बहुमान मिळालेला असताना त्याहीपेक्षा मोठा बहुमान बिनविरोध नगराध्यक्ष होण्याचा ताई सचिन वावरे यांना मिळत असताना निर्मिती कन्स्ट्रक्शनचे युवा उद्योजक सचिन आप्पा वावरे यांचेही मोलाचे सहकार्य व सामाजिक कार्यातून माळशिरसकरांनी दिलेले वावरे परिवार यांना प्रेम या सर्वांमुळे सर्वात तरुण बिनविरोध नगराध्यक्ष होण्याचा बहुमान माळशिरसची लेक आणि माळशिरसची सून सौ. ताई सचिन वावरे यांना मिळालेला आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झालेली आहे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घोषणा करणे फक्त बाकी राहिलेले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.