माळशिरस पंचायत समिती बांधकाम उप विभागाचा उप अभियंता पदाचा इस्माईल मुलाणी यांच्याकडे पदभार…

इस्माईल मुलाणी यांचा मस्टर असिस्टंट पदापासून सुरू झालेला प्रवास उप अभियंता पदापर्यंत पोहोचला…
माळशिरस (बारामती झटका)
सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कुलदीप जंगम अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संदीप कोहिनकर कार्यकारी अभियंता श्री. संतोष कुलकर्णी यांच्या शिफारशीने माळशिरस पंचायत समिती बांधकाम उपविभागाचे प्रभारी उप अभियंता आर. एस. रणवरे यांचा उपअभियंता पदाचा पदभार आय. बी. मुलाणी यांच्याकडे दि. 18 डिसेंबर 2025 रोजी सुपूर्त करण्यात आलेला आहे.
माळशिरस येथील इस्माईल बाबूमिया मुलाणी यांनी प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षणास सुरुवात करून सांगली कॉलेज येथे शिक्षण पूर्ण करून 1987 साली जिल्हा परिषद बांधकाम विभागात मस्टर असिस्टंट पासून नोकरी सुरुवात केलेली आहे. 2003 साली स्थापत्य अभियांत्रिकी पदावर काम केलेले आहे. 2015 साली कनिष्ठ अभियंता पदावर काम केले. 2021 साली शाखा अभियंता राजपत्रित वर्ग 2 दर्जा प्राप्त केलेला होता. सन 2014 ते 2019 पाच वर्ष पंढरपूर तालुक्यांमध्ये नोकरी केलेली आहे. उर्वरित सेवा जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग माळशिरसमध्ये झालेली आहे.

बांधकाम विभागातील मस्टर असिस्टंटपासून सुरुवात केलेले शाखा अभियंतापर्यंत कामाचा अनुभव असल्याने वरिष्ठांनी प्रभारी उप अभियंता पदाची जबाबदारी दिलेली आहे. माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. रघुनाथ पांढरे यांनी इस्माईल मुलाणी यांच्या निवडीचे स्वागत केलेले आहे. इस्माईल मुलाणी यांनी प्रभारी उप अभियंता पदाचा पदभार घेतल्यानंतर मित्रपरिवार व नातेवाईक यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



