Uncategorized

माळशिरस पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी श्री. किरण मोरे यांच्याकडे पदभार…

माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. किरण मोरे यांच्याकडे प्रभारी गटविकास अधिकारी पदाचा पदभार सोलापूर जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्या आदेशाने प्रभारी गटविकास अधिकारी पदाचा पदभार श्री. किरण मोरे यांच्याकडे आलेला आहे.

करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व माळशिरस पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी श्री. मनोज बापूराव राऊत यांची प्रकल्प संचालक जलजीवन मिशन जिल्हा परिषद, धाराशिव येथे बदली झाल्यानंतर माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब हरी पवार यांची नव्याने नियुक्ती झालेली होती.

डॉ. आबासाहेब हरी पवार गटविकास अधिकारी पंचायत समिती वाळवा, जि. सांगली, येथे कार्यरत होते. त्यांनी अद्याप पदभार घेतलेला नाही. श्री. मनोज राऊत यांना पदमुक्त केल्यानंतर रिक्त जागी सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. किरण मोरे यांच्याकडे प्रभारी गटविकास अधिकारी पदाच्या पदभाराचा आदेश देण्यात आलेला आहे.

माळशिरस पंचायत समितीच्या प्रभारी गटविकास अधिकारी पदी श्री. किरण मोरे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्या पुढील कारकिर्दीस बारामती झटका वेब पोर्टल आणि युट्युब चॅनलच्या वतीने हार्दिक शुभेच्छा आहेत.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

6 Comments

Leave a Reply

Back to top button