ताज्या बातम्या

माळशिरस पोलिसांनी मोटारसायकल चोरीचा छडा लावला; जाधववाडी व मेडद दोन आरोपींना केले अटक

माळशिरस पोलिसांची दमदार कामगिरी…

माळशिरस (बारामती झटका)

सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. प्रीतम यावलकर, अकलूज उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. नारायण पवार यांच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष घोगरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष बोंद्रे, पोलीस नाईक दत्ता खरात, पोलीस नाईक मसाजी थोरात, पोलीस नाईक रुपनवर, पोलीस कॉन्स्टेबल अजित कडाळे, पोलीस कॉन्स्टेबल रमेश बोराटे, पोलीस कॉन्स्टेबल वैभव माळी, सायबर शाखेचे युसुफ पठाण यांनी माळशिरस पोलीस स्टेशन हद्दीतील मोटरसायकल चोरीचा छडा लावून दोन अट्टल मोटरसायकल चोर गणेश बाळासो जाधव रा. जाधववाडी व अनिल उर्फ संदीप दिलीप लवटे रा. मेडद, ता. माळशिरस यांना जेरबंद केल्यानंतर वेगवेगळ्या कंपनीच्या 14 मोटरसायकली हस्तगत करण्यात आलेल्या असून 02 लाख 80 हजार रुपये किंमतीच्या मोटरसायकली हस्तगत केल्या असून आरोपीकडून 13 गुन्हे उघडकीस आलेले आहेत.

यातील हकीगत अशी, माळशिरस पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 147/2024 भादवीक 379 प्रमाणे दाखल गुन्ह्यातील फिर्यादी यांची मोटरसायकल राहते घरासमोर लावलेली असताना दि. 29/03/2024 रोजी पहाटे 2.30 वाजता ते दि. 30/03/2024 रोजीचे पहाटे 05 वाजेचे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. मजकुराची फिर्याद वरीलप्रमाणे दाखल होती. सदर गुन्ह्याच्या तपास कामी लागलीच पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी गुन्ह्यातील अज्ञात आरोपींच्या शोधासाठी पथकांना सूचना दिल्या.

विशेष पथक नेमून सदर गुन्ह्यातील मोटरसायकल व अज्ञात आरोपींचा शोध घेतला असता गोपनीय बातमीदारांकरवी माहिती मिळाली की, सदर फिर्यादी यांची मोटरसायकल मेडद जाधववाडी परिसरातील आरोपींनी चोरली आहे. अशी माहिती मिळाल्याने त्या दृष्टीने शोध केला असता सदर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून गुन्ह्यातील माल एक मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे. सदरच्या दाखल गुन्ह्याचा तपास करीत असताना आरोपीने माळशिरस पुणे, म्हसवड, फलटण, पाटस, शिंगणापूर, माळशिरस येथून मोटरसायकली चोरी केलेल्या आहेत. वेगवेगळ्या चौदा कंपनीच्या मोटरसायकली हस्तगत करण्यात आलेल्या आहेत.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

8 Comments

  1. Olá, acho que vi que você visitou meu blog, então vim retribuir o favor. Estou tentando encontrar coisas para melhorar meu site. Suponho que não há problema em usar algumas de suas ideias

  2. I loved as much as you will receive carried out right here The sketch is attractive your authored material stylish nonetheless you command get got an impatience over that you wish be delivering the following unwell unquestionably come more formerly again since exactly the same nearly a lot often inside case you shield this hike

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button