ताज्या बातम्यासामाजिक

सदाशिवनगर येथे प्रज्योत तात्या सालगुडे पाटील मित्र मंडळाच्या 35 व्या वर्षी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना संपन्न झाली.

यशस्वी उद्योजक श्री. दीपक रामचंद्र दीक्षित व उत्कृष्ट गृहिणी सौ. वंदना दीपक दीक्षित या उभय दाम्पत्यांच्या शुभहस्ते गणेश मूर्ती प्रतिष्ठापना संपन्न झाली..

सदाशिवनगर (बारामती झटका)

माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर येथील
प्रज्योततात्या सालगुडे पाटील मित्रमंडळाची स्थापना १९८९ साली झालेली आहे. यंदाचे ३५ वे वर्ष आशीर्वाद स्व. नामदेवराव नारायणराव सालगुडे पाटील, संस्थापक श्री. प्रताप नामदेवराव सालगुडे पाटील, मार्गदर्शक श्री. दिपक रामचंद्र दिक्षित व डॉ. श्री. विजयसिंह शिवाजी भगत, अध्यक्ष ह.भ.प.श्री. महादेव नामदेव भोसले व अनेक सदस्य ग्रामस्थांच्या उपस्थितीत गणेशोत्सव २०२४ मंडळाच्या श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठापना यशस्वी उद्योजक श्री. दिपक रामचंद्र दिक्षित व उत्कृष्ट गृहिणी सौ. वंदना दिपक दिक्षित यांच्या शुभहस्ते संपन्न झाली.

यावेळी मंडळाच्या वतीने उभयंतांचा सत्कार करण्यात आला. उत्कृष्ट गृहिणी सौ. वंदना दीपक दीक्षित यांचा सन्मान आदर्श गृहिणी सौ. अनिता सुभाष सुज्ञे यांनी केला.

गणरायाची प्रतिष्ठापना करण्यापूर्वी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी गणेशाचे आगमन सोहळा टाळ मृदुंगांच्या गजरामध्ये वारकरी दिंडीप्रमाणे हरिनामाच्या गजरात मिरवणूक काढून करण्यात आलेली होती.

प्रज्योत तात्या सालगुडे पाटील मित्र मंडळ सामाजिक उपक्रम गणपती उत्सव व इतर वेळी करत असतात.

मंडळाचे विविध उपक्रम दरवर्षी स्व. रत्नप्रभादेवी शंकरराव मोहिते पाटील यांच्या स्मरणार्थ कर्मवीर बाबासाहेब पाटील विद्यालय सदाशिवनगर येथे इ. ५ वी ते १२ वी मध्ये प्रथम येणाऱ्या मुलींना पारितोषिक, वह्या, रोख रक्कम बक्षीस व ट्रॉफी दिली जाते. तसेच मुलींच्या मातांचाही सन्मान केला जातो. तसेच दरवर्षी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये वारकऱ्यांना मोफत चहा व अल्पोपहार व अन्नदान केले जाते. रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण तसेच अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात.

गणेश जयंती व गणेशोत्सवानिमित्त भव्य स्वरूपात अन्नदान केले जाते. गणेशोत्सवामध्ये विविध मनोरंजनाचे कार्यक्रमही असतात.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button