माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठानचे प्रमुख मार्गदर्शक प्रकाश सुरवसे यांची मंत्रालयातील सर्वोच्च पदावर पदोन्नती
![](https://baramatizatka.com/wp-content/uploads/2024/05/Screenshot_2024_0518_083103.png)
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठानचे प्रमुख मार्गदर्शक श्री. प्रकाश बबनराव सुरवसे यांची मंत्रालयातील सर्वोच्च पदावर पदोन्नती होवून सहसचिव पदी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागात नेमणूक झालेली आहे. श्री. प्रकाश सुरवसे यांची सन १९९१ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत मंत्रालय प्रथम नियुक्ती झाल्यानंतर कक्ष अधिकारी, अवर सचिव, उपसचिव आदी पदांवर त्यांनी कामकाज केलेले आहे. तसेच गेली दहा वर्षे उपसचिव पदावर विविध विभागांमध्ये कामकाज केलेले आहे.
आतापर्यंत सामान्य प्रशासन, गृह निर्माण विभाग, उच्च व तंत्र शिक्षण, महसूल विभाग, अन्न नागरी पुरवठा, मंत्री आस्थापना आणि वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागात काम केलेले आहे.
श्री. प्रकाश सुर्वे यांना पदोन्नती मिळाल्याने माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून सर्व सदस्यांनी अभिनंदनाचा वर्षाव करून पुढील कामकाजास हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.