माळशिरस तालुका कृषी अधिकारी आबासाहेब रुपनवर यांचा सन्मान संपन्न.

माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस तालुका कृषी अधिकारी सौ. पुनम चव्हाण यांची बदली झाल्यानंतर नूतन तालुका कृषि अधिकारी आबासाहेब रुपनवर माळशिरस तालुका कृषी अधिकारी पदावर हजर झालेले आहेत. त्यांचा सन्मान भांब गावचे कर्तव्यदक्ष सरपंच पोपट (तात्या) सरगर यांनी केला. यावेळी संघर्षयात्री ज्येष्ठ विचारवंत दादासाहेब हुलगे, कृषि सहाय्यक अर्जुन वाघमोडे, माजी उपसरपंच महादेव सिद, कृषि सहाय्यक रणजीत वलेकर, कृषि पर्यवेक्षक मुळे आदी उपस्थित होते.
माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात कायम दुष्काळी असणाऱ्या भांब गावच्या विकास कामाविषयी चर्चा झाली. भांब या दुष्काळी गावाला कृषि विषयक योजनांसाठी विशेष सहकार्य राहिल अशी ग्वाही यावेळी नूतन तालुका कृषी अधिकारी आबासाहेब रूपनवर यांनी दिली.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.