ताज्या बातम्याराजकारण

माळशिरस तालुका सर्वपक्षीय आघाडीची रणनीती ठरवण्याच्या बैठकीचे आयोजन…

माढा लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने सर्वपक्षीय समविचारी नेते व कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन..

माळशिरस (बारामती झटका)

माढा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने माळशिरस तालुक्यातील सर्वपक्षीय समविचारी नेते व कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये पुढील राजकीय रणनीती ठरविण्यासाठी रविवार दि. २१/०४/२०२४ रोजी सायंकाळी ७ वाजता खुडूस, ता. माळशिरस, येथील न्यू इंग्लिश स्कूल अकलूज – खुडूस रोड लगत बैठकीचे आयोजन केलेले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने माळशिरस तालुक्यात विविध राजकीय परिस्थितीविषयी माळशिरस तालुक्यातील मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे.

तालुक्यामध्ये वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत असताना मतमतांतर होत आहे. यासाठी माळशिरस तालुका सर्वपक्षीय आघाडी समविचारी नेत्यांची लोकसभा निवडणुकीत रणनीती ठरविण्यासाठी बैठकीचे आयोजन केलेले आहे. तरी सर्वपक्षीय आघाडीतील नेते व कार्यकर्ते यांनी वेळेवर उपस्थित राहावे, अशी माळशिरस तालुका सर्वपक्षीय आघाडीच्यावतीने विनंती करण्यात येत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
06:53