महाळुंग येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त कीर्तन महोत्सवाचे आयोजन
महाळुंग (बारामती झटका)
महाळुंग ता. माळशिरस, येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कीर्तन महोत्सवाचे आयोजन दि. १७ मे २०२३ ते दि. १९ मे २०२३ यादरम्यान श्रीदत्त गणेश उत्सव मंडळ, श्रीराम गणेशोत्सव मंडळ व समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, गट नं. २ येथे करण्यात आले आहे.
दि. १७ मे २०२३ रोजी ह. भ. प. प्रशांत महाराज चव्हाण यांचे कीर्तन होणार आहे. तर, या दिवशी तानाजी गुलाब लोंढे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. १८ मे २०२३ रोजी झी टॉकीज वरील सर्वात सुप्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. मधुकर महाराज गिरी (नान्नज) यांचे कीर्तन होणार आहे. तर, या दिवशी लवळे बंधू, नाळे व तरडे परिवार यांच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. १९ मे २०२३ रोजी श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे १८ वंशज ह. भ. प. गुरुवर्य निवृत्ती महाराज नामदास (पंढरपूर) यांचे कीर्तन होणार आहे. तर, या दिवशी बाळकिसन प्रल्हाद पाखरे यांच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या तीन दिवशी सायंकाळी ७.३० ते ९.३० यादरम्यान कीर्तन होणार असून यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तरी महाळुंग व परिसरातील सर्व भाविकभक्तांनी या कीर्तन सोहळा व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng