ताज्या बातम्या

माळशिरस तालुक्याच्या एमआयडीसीच्या स्वप्नाची पूर्णत्वाकडे वाटचाल – ॲड. सोमनाथ वाघमोडे.

धुळदेव-म्हसवड कॉरिडॉरमध्ये माळशिरस तालुक्यातील गारवाड गावच्या समावेशासाठी अधिकाऱ्यांच्या शिष्ट मंडळाची भेट…

माळशिरस (बारामती झटका)

महाराष्ट्राच्या उद्योग व्यवसायाला चालना देणाऱ्या धुळदेव-म्हसवड कॉरिडोरमध्ये माळशिरस तालुक्यातील गारवाड गावचा समावेश झाल्यानंतर माळशिरस तालुका सुजलाम सुफलाम होऊन तरुणांच्या हाताला काम मिळून उद्योग व्यवसायामध्ये वाढ होणार असल्याने लोणंद फलटण पंढरपूर रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष खंडकरी शेतकऱ्यांचे नेते ॲड. सोमनाथ वाघमोडे, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोरभैय्या सुळ पाटील, युवा उद्योजक अमोल यादव, माळशिरस तालुका विकास आघाडीचे मुख्य प्रवर्तक ॲड. प्रशांतराव रूपनवर पाटील यांचे सातत्याने प्रयत्न सुरू होते. त्यांच्या प्रयत्नाला यश आलेले असून धुळदेव-म्हसवड कॉरिडॉरमध्ये माळशिरस तालुक्यातील गारवाड गावच्या समावेशासाठी अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ गारवाडच्या माळरानावर आलेले होते. त्यामध्ये पुणे एमआयडीसीचे अधीक्षक अभियंता सुधीर नागे साहेब, सांगली एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता इराप्पा नाईक साहेब, सांगली एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे मॅडम, सोलापूर एमआयडीसीचे उपअभियंता अशोक मगर, सोलापूर एमआयडीसीचे भूमापक प्रमुख आरेफ पठाण साहेब, एमआयडीसी सोलापूर सहाय्यक अभियंता खंदारे साहेब यांनी भेट देऊन जागेची पाहणी केलेली आहे. त्यामुळे माळशिरस तालुक्यातील अनेक दिवसांचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने एमआयडीसीसाठी सातत्याने प्रयत्न करीत असलेले खंडकरी शेतकऱ्यांचे नेते ॲड. सोमनाथ अण्णा वाघमोडे यांनी माळशिरस तालुक्याच्या एमआयडीसीच्या स्वप्नाची पूर्णत्वाकडे वाटचाल होत असल्याबद्दल समाधान व आनंद व्यक्त केलेला आहे.

ॲड. सोमनाथ वाघमोडे यांनी माळशिरस तालुक्यामध्ये गारवाड हद्दीत छत्रपती उदयनराजे महाराज यांची 5000 एकर जमीन आहे‌. सदरची जमीन एमआयडीसीसाठी मिळावी यासाठी त्यांच्या मातोश्री श्रीमंत छत्रपती राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी भेट घेऊन उद्योग मंत्री उदय सामंत यांना सहमती पत्र दिलेले होते.

तत्कालीन माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू होते. आरोग्यमंत्री नामदार डॉ. तानाजीराव सावंत, माजी मंत्री महादेवरावजी जानकर यांनी सुद्धा बैठका घेऊन सातत्याने प्रयत्न केलेले होते. माळशिरस तालुक्यात एमआयडीसी व्हावी यासाठी अनेक सुशिक्षित व बेरोजगार तरुणांची मागणी होती. यासाठी सातत्याने ॲड. सोमनाथ वाघमोडे, माजी उपसभापती किशोरभैय्या सुळ पाटील, युवा उद्योजक अमोल यादव यांचे सातत्याने प्रयत्न सुरू होते.

लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी माळशिरस तालुका विकास आघाडी निर्माण झालेली होती. त्यावेळेस उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या समवेत पुणे येथे बैठक संपन्न झाली होती. त्यावेळेस माळशिरस तालुका विकास आघाडीची प्रमुख मागणी माळशिरस तालुक्यात एमआयडीसी व्हावी याचबरोबर निरा देवधर प्रकल्प, फलटण पंढरपूर रेल्वे यासह अनेक मागण्या होत्या. त्यापैकी माळशिरस तालुक्यात एमआयडीसी व्हावी या मागणीचा प्रश्न मार्गी लागलेला आहे.

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी श्रीराम बंगला निवासस्थानी झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये माळशिरस तालुक्यात एमआयडीसीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितलेले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना धुळदेव-म्हसवड कॉरिडॉरमध्ये गारवाड गावचा समाविष्ट व्हावा, यासाठी अगोदरच पत्रव्यवहार केलेला होता.





उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत, माजी मंत्री महादेवराव जानकर, दमदार आमदार राम सातपुते यांच्या मागणीला व सततचा पाठपुरावा करणारे ॲड. सोमनाथअण्णा वाघमोडे, माजी उपसभापती किशोर भैय्या सुळ पाटील, युवा उद्योजक अमोल यादव यांच्या प्रयत्नाला यश आलेले असल्याने माळशिरस तालुक्यात समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

1,117 Comments

  1. best online pharmacies in mexico [url=https://northern-doctors.org/#]mexican pharmacy northern doctors[/url] mexico pharmacies prescription drugs

  2. medicine in mexico pharmacies [url=http://northern-doctors.org/#]Mexico pharmacy that ship to usa[/url] buying prescription drugs in mexico online

  3. buying prescription drugs in mexico online [url=https://cmqpharma.online/#]cmq pharma mexican pharmacy[/url] buying prescription drugs in mexico

  4. purple pharmacy mexico price list [url=http://mexicandeliverypharma.com/#]mexican online pharmacies prescription drugs[/url] mexico pharmacies prescription drugs

  5. pharmacies in mexico that ship to usa [url=https://mexstarpharma.online/#]buying prescription drugs in mexico[/url] п»їbest mexican online pharmacies

  6. mexico pharmacies prescription drugs [url=http://mexicanpharma.icu/#]mexico pharmacies prescription drugs[/url] п»їbest mexican online pharmacies

  7. trouver un mГ©dicament en pharmacie [url=https://pharmaciepascher.pro/#]trouver un mГ©dicament en pharmacie[/url] vente de mГ©dicament en ligne

  8. Viagra homme prix en pharmacie sans ordonnance [url=https://vgrsansordonnance.com/#]Viagra generique en pharmacie[/url] SildГ©nafil 100 mg prix en pharmacie en France

  9. buying prescription drugs in mexico [url=http://mexicanpharm24.pro/#]pharmacies in mexico that ship to usa[/url] buying from online mexican pharmacy

  10. deneme bonusu veren yeni siteler [url=http://denemebonusuverensiteler.top/#]deneme bonusu veren siteler 2024[/url] deneme bonusu veren siteler betturkey betturkey.com

Leave a Reply

Back to top button