ताज्या बातम्याराजकारण

माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागातून खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना विक्रमी मतदान होणार….

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गटाचे आमदार बबनदादा शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस गटाचे राजकुमार पाटील उर्फ राजू नाना दोन्ही गट सक्रिय झाले आहेत.

महाळुंग (बारामती झटका)

माढा विधानसभा मतदारसंघात असणारी माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागातील 14 गावांमधून माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना विक्रमी मतदान होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माढा विधानसभा मतदार संघाचे षटकार पाणीदार आमदार बबनदादा शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांचे निष्ठावान व भारतीय जनता पक्षाचे सोलापूर जिल्हा माजी अध्यक्ष व विद्यमान प्रांतिक सदस्य राजकुमार पाटील उर्फ राजू नाना यांचे दोन्ही गट एक दिलाने सक्रिय झालेले आहेत. त्यामुळे माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागात मोहिते पाटील यांच्या विरोधात जाणाऱ्या मतदानाचा विक्रम होईल अशी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे.

माढा विधानसभा मतदारसंघात असणाऱ्या 14 गावांमध्ये पाणीदार आमदार बबनदादा शिंदे, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सोलापूर जिल्हा दूध संघाचे विद्यमान चेअरमन भावी आमदार रणजीत भैया शिंदे पूर्व भागांमधील सर्वसामान्य जनता व शेतकरी बांधव यांच्या पाठीशी ठाम उभा राहिलेले आहेत. पूर्वभागातील शेतकऱ्यांचा उसाचा प्रश्न सोडविलेला आहे. आमदार बबनदादा शिंदे यांचा पूर्व भागामध्ये मोठा मतदार आहे. माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागात भारतीय जनता पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून राजकुमार पाटील यांची ओळख आहे. विधानसभेला माढ्यात असणारी गावे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत माळशिरस तालुक्यात असतात‌. अशावेळी राजकुमार पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून स्वतःचे अस्तित्व कायम टिकवून ठेवलेले आहे.

राजकुमार पाटील यांच्या विचाराचा स्वतंत्र गट आहे. महायुतीमध्ये भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस व राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार एकत्र असल्याने माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागात आमदार बबनदादा शिंदे व राजकुमार पाटील यांचे गट एकत्र येऊन काम करीत आहेत. माढा लोकसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी 40 वर्षाचा प्रलंबित असणारा ग्रामदैवत यमाई देवीच्या जीर्णोद्धाराचा प्रश्न सोडवून 14 गावातील अनेक प्रश्न सोडवून निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे महाळुंग पंचक्रोशीसह 14 गावातील नेते कार्यकर्ते मतदार समाधानी आहेत, ही झाली एक बाजू. तर, दुसऱ्या बाजूला शिवरत्न वरील मोहिते पाटील यांनी 14 गावातील जनतेशी सुडाचे राजकारण करून जनतेला नाहक त्रास दिलेला आहे.

धैर्यशील मोहिते पाटील यांची उमेदवारी असल्याने 14 गावातील मतदारांना सूड उगवण्याची संधी मिळालेली आहे. खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचा विकासात्मक दृष्टिकोन आमदार बबनदादा शिंदे व राजकुमार पाटील यांचे पक्षीय धोरण यामुळे माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागातून कार्य तत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना विक्रमी मतदान होणार आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button