माळशिरस तालुक्याच्या पूर्व दक्षिण शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणाऱ्या निरा उजवा विभागाच्या माचनूर उपविभागाचा प्रश्न मिटणार…

महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार मा. आ. राम सातपुते यांच्या मागणीने मंत्रालयात बैठकीचे आयोजन…
वेळापूर (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार आरोग्यदूत राम सातपुते यांनी माळशिरस मतदारसंघातील निरा उजवा कालवा विभागाच्या अडीअडचणी संदर्भात शेतकरी प्रतिनिधी व अधिकारी यांच्या समवेत मंत्रालयात बैठक आयोजित करण्याची पत्रान्वये मागणी केलेली होती. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांची पाण्याच्या अडचणी पाहून सोमवार दि. 29/09/2025 रोजी दुपारी 4.30 वाजता मंत्रालयातील मुख्य इमारत सातव्या मजल्यावर बैठकीचे आयोजन केलेले आहे.
सदरच्या बैठकीमध्ये माळशिरस तालुक्यातील निरा उजवा कालव्यावरील माचनूर उपविभागाशी जोडलेल्या गावांना शेतीसाठी सध्या सुरू असलेला 8 माही पाणीपुरवठा बदलून 12 माही पाणीपुरवठा करावा, श्रीक्षेत्र वश्या मारुती देवस्थान या ठिकाणी पर्यटनास चालना मिळण्यासाठी निरा देवधर कालवा वितरिका क्रमांक 52 वरील दारे नंबर 12 शेजारी नवीन दारे तयार करून एक मीटर व्यासाची सुमारे 2100 मीटर लांब पाईपलाईन टाकून बिगर सिंचन ग्राहक म्हणून नोंद व्हावी, निरा उजवा कालवा उपफाटा 95/ 3 हा पंढरपूर कार्यालयाकडून कमी करून माळशिरस पाटबंधारे विभागास जोडावा, मौजे कोळेगाव व मोजे खंडाळी येथील तलाव निरा उजवा कालवा विभागाकडून प्रत्येक वर्षी पाण्याने भरून घेण्यात यावेत, मौजे पिलीव एस्केप नं. 11 चेंज 138/ 650 किलोमीटरच्या गेटमधून कायमस्वरूपी उन्हाळ्यामध्ये पाणी सोडण्यात यावे इत्यादी विषयांची बैठक आपल्या दालनामध्ये आयोजित करावी, असा पत्रव्यवहार लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांनी केलेला होता.


माळशिरस तालुक्याच्या पूर्व दक्षिण मधील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणाऱ्या निरा उजवा विभागाच्या माचनूर उपविभागाचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार असल्याने वेळापूर, निमगाव मगराचे, तोंडले, दसुर, मळोली, तांदुळवाडी, शेंडेचिंच, धानोरे, फळवणी, कोळेगाव या गावातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. वरील गावे गेल्या दशकापासून अचानक माचनूर उपविभागाला जोडलेली असल्याने बारमाही पाण्याची गावे आठ माही झालेली होती. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड व मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झालेले होते.


शेतकऱ्यांना कोणी लोकप्रतिनिधींच्या रूपाने वाली आहे का नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना निर्माण झालेला होता. अनेक लोकप्रतिनिधी स्वतःला स्थानिक समजत आहेत परंतु, खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा कळवळा असणारे माळशिरस तालुक्याचा गोरगरिबांचा तारणहार शेतकऱ्यांचा आधारवड सर्वसामान्य जनतेचा आरोग्यदूत आपला माणूस कामाचा माणूस असणारे माळशिरस तालुक्यामध्ये विकासाची गंगा आणून लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक उपेक्षित ठेवलेल्या भागाचा विकास करणारे विकासरत्न माजी आमदार राम सातपुते यांनी खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या भावी पिढीचा कायमस्वरूपी दुष्काळ घालवणार आहेत. बारमाही पाण्याचा प्रश्न मिटणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



