ताज्या बातम्यासामाजिक

माळशिरस तालुक्यात अवैधरित्या विनापरवाना कमरेला पिस्तूल बाळगून फिरत असलेल्या व्यक्तीला पोलिसांकडून अटक…

अकलूज (बारामती झटका)

मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, अनिकेत महादेव पडसळकर, रा. खंडाळी, ता. माळशिरस हा व्यक्ती स्वतःजवळ अवैधरीत्या विनापरवाना गावठी पिस्तूल कमरेला बाळगून फिरत असल्याचे समजले. सदर माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, अकलूज विभागाच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तत्काळ कारवाई केली. दि. 20/09/2025 रोजी पहाटे 03.25 वाजता मौजे मांडवे, ता. माळशिरस येथे सदर इसमास पकडण्यात आले.

तपासणीदरम्यान आरोपीकडून देशी बनावटीचे गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले. या प्रकरणात नातेपुते पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदवून आरोपीस अटक करण्यात आली आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण श्री. अतुल कुलकर्णी सो, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज श्री. संतोष वाळके व स.पो.नि. श्री. संदीप गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, अकलूज विभागाच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील एएसआय श्रीकांत निकम, पोलीस नाईक राकेश लोहार, व पोलीस नाईक दत्ता खरात यांनी विशेष मेहनत घेतली.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom