माळशिरस तालुक्यात कमळ फुलवायचं असेल, तर पाणी सत्याचं, खत निष्ठेचं हवं, नाटकांचं नाही – बाळासाहेब वावरे

माळशिरस (बारामती झटका)
भाजप हे केवळ एक राजकीय संघटन नाही, तर ती एक विचारसरणी आहे. संघर्षातून उभं राहिलेलं, तत्त्वांवर चालणारं आणि संघटनशक्तीवर विश्वास ठेवणारं.
या पक्षाचं कमळ फुलवण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी त्याग केला,
आपलं व्यक्तिगत आयुष्य विसरून विचारांसाठी राबले. मात्र, आज माळशिरस तालुक्यातील तथाकथित नेते व काही प्रस्थापित मंडळींना वाटतं की, फोटोसेशन, नेत्यांचे वाढदिवसाचे कार्यक्रम घेणे आणि बड्या नेत्यांच्या अवतीभोवती फिरणं म्हणजे निष्ठा !
सत्तेचा वारा जिकडे वाहतो, तिकडे वळणारी माळशिरस तालुक्यातील काही मंडळी आज भाजपच्या भोवती फिरताना दिसत आहे.
कालपर्यंत पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात काम करणारे, आज पुन्हा-पुन्हा मंचावर येऊन पक्षप्रेम दाखवतात. त्यांची राजकीय पार्श्वभूमी पाहिली तर स्वतःच्या स्वार्थासाठी, जिकडे सत्तेची भेळ खायला मिळते तिकडे हे जातात पक्ष बदलतात.
पण तालुक्यातील नजरेत हे “नाटक” स्पष्ट दिसतं आहे.
“नेते येतात-जातात, पण विचार कायम राहतो.”
हा विचार म्हणजे सत्य, प्रामाणिकपणा आणि जनसेवा.
ज्यांनी या विचारावर श्रद्धा ठेवली, तेच कार्यकर्ते आज पक्षाचा कणा बनले आहेत.
आणि जे फक्त पद, प्रसिद्धी किंवा संधी पाहतात, अशा लोकांना पक्षात जागा दिली नाही पाहिजे.
अशी भावना तालुक्यातील सर्व-सामान्य भारतीय जनता पार्टीच निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची आहे.
माळशिरस तालुक्यात येणाऱ्या निवडणुकीत पक्षाचं कमळ हे फसव्या दिखाव्याने नाही तर निष्ठेच्या घामाने फुलणार आहे यात शंका नाही.
रामभाऊ सातपुते सारखे संघर्षशील नेतृत्व भाजपा कडे आहे आणि त्यांच्या नेतृत्वात भाजपा अतिशय सक्षमपणे वाढत आहे याचा आनंद आहे.
– श्री.बाळासाहेब वावरे -४० वर्षांपासून माळशिरस तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचा एक निष्ठावान कार्यकर्ता
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



