माळशिरस तालुक्यात तिसऱ्या आघाडीचा प्रयोग करण्याच्या प्रयत्नाचा फुगा फुटला – प्रा. विनायक ठवरे पाटील

जनता आणि सर्व भाजपा कार्यकर्ते रामभाऊ सातपुतेंच्या मागे ताकतीने उभा
सुपारी बहाद्दर स्वयंघोषित नेत्यांचा राजकीय कुटील डाव ओळखल्याने संगमच्या मेळाव्याकडे तालुक्यातील दिग्गज नेत्यांनी पाठ फिरवली – खुडूस गावचे जनतेतील लोकनियुक्त सरपंच प्रा. विनायक ठवरे पाटील..
खुडूस (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने मोरोची येथे भाजप महायुती मित्रपक्ष समविचारी संघटना माळशिरस तालुका विकास आघाडी यांचा संवाद मेळावा झालेला होता. सदरच्या मेळाव्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या विषयी जास्त चर्चा होणे गरजेचे होते. मात्र, वेगळीकडेच विषय नेऊन संवाद साधण्याचा प्रयत्न झालेला होता. त्यामुळे भाजप महायुती मित्रपक्ष समविचारी संघटना व माळशिरस तालुका विकास आघाडी यांचा संवाद मेळाव्याचा बुडबुडा संगम येथे फुटला आहे. सुपारी बहाद्दर स्वयंघोषित नेत्यांचा राजकीय कुटील डाव ओळखल्याने संगमच्या मेळाव्याकडे तालुक्यातील दिग्गज नेते राजकुमारनाना पाटील, प्रकाशबापू पाटील, शंकरनाना देशमुख, बाळासाहेब सरगर, दत्तात्रय शेळके, यांच्यासह भाजप महायुती मित्रपक्ष समविचारी संघटनेच्या नेत्यांनी पाठ फिरवली असल्याचा घणाघात खुडूस गावचे जनतेतील लोकनियुक्त सरपंच प्राध्यापक विनायक ठवरे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

माळशिरस तालुक्यात लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राजकीय चित्र बदललेले होते. लोकसभेच्या निवडणुकीत माळशिरस तालुक्यात माळशिरस तालुका विकास आघाडी माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या समवेत बैठक झाली होती. त्या बैठकीला मी स्वतः उपस्थित होतो. लोकसभेला भारतीय जनता पक्षाच्या कामाला सुरुवात केली तेव्हापासून विधानसभा निवडणुकीत काम केले. येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे व महायुतीचे काम जोराने करणार असल्याचे ठाम सांगितले.
विधानसभेच्या निवडणुकीत भाजप व महायुती समवेत नसणारे सुपारी बहाद्दर स्वयंघोषित नेत्यांनी मोहिते पाटील व जानकर यांच्या सांगण्यावरून कटपुतली सारखे नाचणारे नेते यांचे संगम येथील संवाद मेळाव्यामध्ये बिंग फुटलेले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीविषयी जास्त न बोलता माळशिरस तालुक्यामध्ये ज्यांनी स्वाभिमानाने जनतेची मान ताठ केली, गेल्या 70 वर्षात विकासापासून वंचित ठेवलेल्या जनतेचे व व्यक्तिगत लोकांचे काम केले, गोरगरीब व सर्वसामान्य लोकांच्या आर्थिक अडचणी लक्षात घेऊन कोणताच अवयव शिल्लक राहिला नाही, अशा सर्व अवयवांचे मोफत पुणे, मुंबई येथे ऑपरेशन केली. अनेकांचे रस्ते केले, लाईटचे प्रश्न, डीपीचा प्रश्न, सभामंडप, समाज मंदिरे, स्ट्रीट लाईट अशी अनेक कामे या माळशिरस तालुक्यामध्ये मा. आ. राम सातपुते यांनी केली. त्यांच्यावरच भाषणातून मोहिते पाटील व जानकर यांची सुपारी घेऊन सुपारी बहाद्दर तोंड सुख घेत होते. खऱ्या अर्थाने राम सातपुते 24 कॅरेट सोने आहे. जेवढं टीकाटिपणी कराल तेवढच सोन्याला तापवल्यानंतर झळकत तशाच पद्धतीने सर्वसामान्य व गोरगरीब जनतेचा आधारवड असणारे राम सातपुते यांचे नेतृत्व झळकत राहणार आहे.

संगमच्या मेळाव्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीत अनेक नेते व कार्यकर्ते यांनी राम सातपुते यांच्या विरोधात काम केले तेच प्रामुख्याने उपस्थित होते. मोहिते पाटील समर्थक यांनी संघाच्या संवाद मेळाव्याला गर्दी दिसण्याकरता उपस्थिती दर्शवलेली होती. त्यामुळे समाज माध्यमांनी प्रेक्षकांकडे कॅमेरे न वळवता व्यासपीठावर बसलेले यांच्याकडेच कॅमेऱ्याच्या रोख होता. यावरून संगमच्या संवाद मेळाव्यात खऱ्या अर्थाने बुडबुडा फुटलेला आहे. माजी आमदार राम सातपुते यांच्यावर भाषणामध्ये टीकाटिप्पणी केलेली भाषणे मोहिते पाटील व जानकर समर्थक सोशल मीडियावर जाणीवपूर्वक फिरवत आहेत. यावरून मोहिते पाटील व जानकर यांची सुपारी घेऊन माजी आमदार राम सातपुते यांचं नेतृत्व, कर्तृत्व व दातृत्व पुसून काढण्यासाठी माळशिरस तालुक्यात लबाडांची टोळी कार्यरत आहेत. सर्वसामान्य व गोरगरीब जनता माजी आमदार राम सातपुते यांच्या कार्यावर समाधानी आहे.
भारतीय जनता पक्षाच्या सदस्यता अभियानामध्ये माळशिरस तालुक्यात 71 हजार सभासदांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारलेले आहे. ज्यांना गल्लीमध्ये नव्हे तर घरामध्येही कवडीची किंमत नाही, अशी समाजातील कवडीमोल नेते व कार्यकर्ते जिल्हा परिषद व पंचायत समितीला स्वतंत्र गट उभा करून आपले अस्तित्व सिद्ध करावे, असा टोला खुडूसगावचे लोकनियुक्त जनतेतील सरपंच विनायकराव ठवरे पाटील यांनी सुपारी बहाद्दर स्वयंघोषित नेत्यांना लगावलेला आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



