माळशिरस तालुक्यातील 103 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत होणार…..

माळशिरस (बारामती झटका)
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय ग्रामपंचायत शाखा यांच्याकडील आदेशानुसार माळशिरस तालुक्यातील 103 सरपंच पदाचे आरक्षण 2020 ते 2030 कालावधीची आरक्षण सोडत असल्याचे माळशिरसचे तहसीलदार सुरेश शेजुळ यांनी गटविकास अधिकारी माळशिरस यांना पत्रान्वये कळविण्यात आलेले आहे.
तहसील कार्यालय माळशिरस यांच्या पत्रामध्ये माळशिरस तालुक्यातील 103 ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे सन 2025 ते 2030 साठीचे आरक्षण कामे मा. जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर (ग्रामपंचायत शाखा) यांचेकडील आदेश क्र/सा.वि. ग्रा.प. 3 आर आर 345/ 20 25 दि. 09/04/2025 अन्वये तहसीलदार यांना प्राधिकृत करण्यात आलेले आहे.
तरी आपणांस कळविण्यात येते की, माळशिरस तालुक्यातील 103 ग्रामपंचायतीच्या सन 2025 ते 2030 साठीच्या सरपंच पदाचे आरक्षण मंगळवार दि. 22/04/2025 रोजी सकाळी ठीक 11 वाजता पंचायत समिती सभागृह माळशिरस येथे आयोजित करण्यात आलेले आहे. तरी आपण अधिनस्त सर्व ग्रामपंचायत अधिकारी यांना संबंधित सर्व गावातील जनतेस दवंडीद्वारे जाहीर सूचना देणे बाबत तसेच ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डावर सदर आरक्षण सोडत बाबत या सोबत जोडण्यात आलेले आरक्षण जाहीर अहवाल आवाहन सूचना फलकावर टाकून गावात जाहीर प्रसिद्धी द्यावी, असे गटविकास अधिकारी माळशिरस यांना पत्र देऊन सदरच्या प्रति ग्राममहसूल अधिकारी सर्व उपविभागीय अधिकारी माळशिरस अकलूज यांना देण्यात आलेली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.