माळशिरस तालुक्यातील भाजपच्या गद्दारांचे स्टिंग ऑपरेशन करण्याकरता देवाभाऊ यांनी डॉ. रामभाऊ सातपुते यांची केली नियुक्ती…

माळशिरस (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री व भाजपचे नेते देवेंद्रजी फडणवीस उर्फ देवाभाऊ यांनी माळशिरस तालुक्यातील भाजपच्या गद्दारांचे स्टिंग ऑपरेशन करण्याकरता भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांची डॉक्टर म्हणून नियुक्ती केलेली असल्याचे निष्ठावान भाजपच्या कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे..
माळशिरस तालुक्याचे ज्येष्ठ नेते व शेळी मेंढी महामंडळाचे माजी अध्यक्ष ॲड. सुभाषअण्णा पाटील, यांनी प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाचे शिलेदार म्हणून कडवी झुंज दिली मात्र, त्या काळामध्ये हुकूमशाही दडपशाही बोगस मतदान व गद्दार यांच्यामुळे अपयश आलेले होते.

माळशिरस तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे लेबल इतर कामासाठी वापरले जाते व निवडणुकीत वेगळी भूमिका घेतलेली आहे. 2009 साली माजी मंत्री सुभाष देशमुख यांच्या विरोधात शरद पवार उभे राहिलेले होते. त्या वेळेला पक्षनिष्ठा बाजूला ठेवून भाजपमधील नेते व कार्यकर्त्यांनी शरदचंद्र पवार यांना साथ दिलेली होती. 2009 च्या विधानसभेच्या निवडणुकीत काकासाहेब मोठे यांच्या विरोधात काम केलेले होते. 2014 साली भाजपचे उमेदवार माजी मंत्री दिलीप कांबळे यांना पक्षाने उमेदवारी दिलेली असताना सुद्धा त्यांच्या विरोधात नेते व कार्यकर्त्यांनी काम केलेले होते. तालुक्यातील प्रस्थापित यांनी स्वतःचे राजकीय अस्तित्व वर्चस्व व स्वार्थ असल्याने 2019 ला भारतीय जनता पक्षाच्या समवेत राहिलेले होते. त्यामुळे पहिल्यांदा माळशिरस तालुक्यात भारतीय जनता पार्टीचे विधानभवनात राम सातपुते यांच्या रूपाने लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेली होती.
तत्कालीन आमदार राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्यामध्ये गेल्या 70 वर्षांमध्ये प्रलंबित असणाऱ्या प्रश्नांना वाचा फोडली. सर्वसामान्य व गोरगरीब जनतेला आमदार कसा असतो याची प्रचिती आली. जनता दरबाराच्या माध्यमातून जनतेला स्वतःचे व सार्वजनिक प्रश्न मांडण्याचे हक्काचे व्यासपीठ तयार झालेले होते. गोरगरीब व सर्वसामान्य माणसाचा आपला माणूस कामाचा माणूस अशी ओळख निर्माण झालेली होती. गोरगरिबांची एवढी ऑपरेशन मोफत केली सर्वांचे आरोग्यदूत बनलेले होते. विधानसभेच्या निवडणुकीत मोहिते पाटील व उत्तमराव जानकर गट एकत्र आलेले होते. भाजपमधील नेते व कार्यकर्ते यांनी गद्दारी करून सुद्धा राम सातपुते यांना एक लाख आठ हजार मताधिक्य मिळालेले होते.
निवडणूक निकाल पराभवानंतर एका तासात श्रीराम बंगला येथे कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्याच क्षणापासून कार्यकर्त्यांच्या कामाला राम सातपुते यांनी सुरुवात केलेले होती. माळशिरस तालुक्यात प्रथमच भारतीय जनता पक्षाचे सदस्यता अभियान नातेपुते येथे राबवून माळशिरस तालुक्याच्या गावागावात वाड्यावस्त्यावर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता सदस्यता अभियानामध्ये सहभागी झालेल्या होता. माळशिरस तालुक्यात प्रथमच भारतीय जनता पक्षाची सदस्यता नोंदणीची चळवळ उभा राहिलेली होती. कार्यकर्त्यांनी जोरदार प्रतिसाद दिलेला होता. केंद्रात व राज्यात भाजपच्या विचाराचे सरकार असल्याने राम सातपुते यांनी कामाचा धडाका लावलेला होता. तालुक्यातील जनता प्रस्थापितांच्या जुलमी राजवटीतून मुक्त होत होती. मोहिते पाटील व जानकर गटाचे नेते व कार्यकर्ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करीत आहेत. कितीतरी नेते व कार्यकर्ते प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. माळशिरस तालुक्यात राम सातपुते यांचे प्रस्थ वाढत आहे. प्रस्थापितांची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रस्थापितांनी शक्कल लढवली. भारतीय जनता पक्षातील काही मंडळींना फुस लावून राम सातपुते त्यांच्या विरोधात राजकीय वातावरण तयार करण्यासाठी सोशल मीडिया पाठीमागे उभा केलेला आहे. तालुक्यातील सुज्ञ व जाणकार मंडळी जाणून आहेत गद्दारीचा बुडबुडा फुटणार आहे कारण, महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तत्कालीन आमदार राम सातपुते यांच्या कार्यावर समाधानी असून आमदार नसताना सुद्धा कार्याचा धडाका सुरू आहे. मोहिते पाटील राम सातपुते यांचा चढता आलेख पाहून हवालदील झालेले आहेत. भाजपमधील गद्दारांना हाताशी धरून भारतीय जनता पक्ष व राम सातपुते यांची बदनामी सुरू आहे. माळशिरस तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नगरपंचायत सर्व अधिकार माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार मा. खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे, भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार राम सातपुते या त्रिमूर्तींकडे दिलेली आहे.

निश्चितपणे माळशिरस तालुक्यातील भाजपच्या गद्दारांचे स्टिंग ऑपरेशन करण्याकरता देवाभाऊ यांनी डॉक्टर राम सातपुते यांची नियुक्ती केलेली भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमधून गावागावात वाड्यावर चौकाचौकात बोलले जात आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



