ताज्या बातम्याराजकारण

माळशिरस तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्ष पदांच्या निवडी जाहीर…

माळशिरस (बारामती झटका)

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी माळशिरस तालुका अध्यक्ष ॲड. शरदचंद्रजी मदने यांनी माळशिरस तालुक्यातील मोठ्या शहरातील शहराध्यक्ष पदांच्या निवडी जाहीर केलेल्या आहेत.

भारतीय जनता पार्टी अकलूज शहराध्यक्ष महादेवराव कावळे, माळशिरस शहराध्यक्ष वैभवराजे जानकर, पिलिव शहराध्यक्ष प्रमोदजी भैंस, नातेपुते शहराध्यक्ष राजेंद्र उर्फ राजूशेठ पांढरे यांच्या निवडी जाहीर केलेल्या आहेत.

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्यात प्रथमच सदस्यता अभियानाचा नातेपुते येथील मधुर मिलन मंगल कार्यालयात शुभारंभ केलेला होता. भारतीय जनता पार्टी खेडोपाडी, वाड्यावस्त्यावर, गावागावात भारतीय जनता पार्टीचा सर्वसामान्य व तळागाळातील कार्यकर्ता सदस्य झालेला आहे. घर तिथे कार्यकर्ता व गाव, वाडी, वस्ती तिथे शाखा अशी भारतीय जनता पार्टीची नव्याने ओळख लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्यात सुरू केलेली आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी शाखा शुभारंभ सुरू आहे.

अकलूज नगर परिषद हद्दीमध्ये अकलूज माळेवाडी येथे 16 शाखांचा शुभारंभ झालेला आहे. पिलीव येथे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे, माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते या त्रिमूर्तींच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व माजी सरपंच व समाजामधील प्रतिष्ठित व्यक्तींनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला होता.

माळशिरस तालुक्यात खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीची ताकद मोठ्या प्रमाणात वाढत आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नगरपंचायत यामध्ये भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकविण्याकरता कार्यकर्ते सज्ज झालेले आहेत. भाजपमध्ये इन्कमिंगला मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेली आहे. पदाधिकाऱ्यांच्या निवडी करून जास्तीत जास्त भारतीय जनता पक्षाची ध्येय धोरणे तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी शहराध्यक्ष पदांच्या निवडी केलेल्या आहेत.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom