माळशिरस तालुक्यातील डॉक्टरांचे नातेवाईक आणि मित्रपरिवार बोगस मेडिक्लेमच्या प्रेमात ?

माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यात अशी अनेक ठिकाणे आहेत, ज्या ठिकाणी मोठमोठे हॉस्पिटल आहेत. त्यामध्ये माळशिरस, अकलूज, नातेपुते, वेळापूर, पिलीव अशा अनेक शहरात व काही गावामध्ये हॉस्पिटल सुरू आहे. काही हॉस्पिटल मधून पात्रता नसलेले ठराविक डॉक्टर मिळून एकत्र हॉस्पिटल चालवितात. मोठमोठे बोर्ड व जाहिरात करतात. परंतु, या हॉस्पिटलमधून एकही तज्ञ डॉक्टर नसल्याने रुग्णांची घोर फसवणूक व आर्थिक लूट केली जाते.
तसेच या हॉस्पिटलमधून डॉक्टरांचे काही जवळचे नातेवाईक व मित्रपरिवार काही वेळेस रुग्ण ॲडमिट नसताना सुद्धा, रुग्ण ॲडमिट असल्याची बोगस बिले काढून मेडिक्लेम फ्रॉड केला जात असल्याचे बोलले जात आहे. मेडिक्लेम इन्वेस्टीगेटरच्या बोगस मेडिक्लेम पास करणारे काही डॉक्टर आणि लॅब चालकांचा गोरख धंदा जोरात चालू असल्याचे शहरांमधून जोरदार चर्चा चालू आहे.
कोरोना काळात काही रुग्णालयाने विमा कंपन्यांना फसवून मोठी माया जमा केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यामध्ये रुग्णांची चांगली सेवा करणारे डॉक्टर सुद्धा अशा गोरख धंदा करणाऱ्या डॉक्टरांमुळे बदनाम होत आहे. धनदांडगे व आजारीपणाचा बहाणा करणारे मेडिक्लेम घेत आहेत, तर गोरगरीब व सर्वसामान्य शेतकरी लाभांपासून वंचित राहत आहेत. त्यामुळे याची सखोल चौकशी करावी, असे तालुक्यातील नागरिकांमधून बोलले जात आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.