माळशिरस तालुक्यातील लाडकी बहीण योजनेपासून एकही लाभार्थी वंचित राहणार नाही – बाळासाहेब सरगर
माळशिरस (बारामती झटका)
आज अकलूज ता. माळशिरस येथील विभागीय कार्यालयामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत मीटिंगचे आयोजन मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना तालुकाध्यक्ष बाळासाहेब सरगर यांच्या अध्यक्षतेखाली व विभागीय अधिकारी विजया पगारकर मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी माळशिरस तालुक्यामधून आत्तापर्यंत नारीशक्ती ॲप 69294 व नवीन पोर्टलवरून 53760 असे एकूण 123054 अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी नारीशक्ती ॲप 68638 व नवीन पोर्टल 52439 असे एकूण 121077 अर्जांना मंजुरी देऊन पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे तर नॉन आधार सीडी पैकी नारीशक्ती ॲप 6631 व पोर्टल 8278 असे एकूण 14909 आधार शेडिंग नसल्याने पेंडिंग आहे.
याबाबत अंगणवाडी सेविका यांना गावागावात जाऊन लाभार्थीपर्यंत पोहोचण्याच्या सूचना दिल्या आहेत. गावांमध्ये ग्रामसेवक व तलाठी यांना गावामध्ये दवंडी देऊन लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्याच्यासुद्धा सूचना देण्यात आल्या असून याबाबत कॅम्प घेऊन आचारसंहितेपूर्वी एकही लाभार्थी यापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे. माळशिरस तालुक्यातून 43 लाभार्थींची पैसे बँकेत कट झाले आहे, याबाबत बँकांची बैठक घेण्यात येणार आहे. शिवाय 1344 अर्ज जन्मतारखेत बदल, आधार कार्डमध्ये व बँक खात्यामधील चुका यामुळे रिजेक्ट झाले. त्याच्या सुद्धा याद्या अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्याकडे देण्यात येणार आहेत.
माळशिरस तालुक्याच्या सर्वांनी केलेले प्रयत्नांमुळे सोलापूर जिल्ह्यात तालुका लाभार्थ्यांमध्ये अग्रेसर आहे. यामध्ये सोलापूर या ठिकाणी आठ तारखेला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदय यांच्या समवेत होणाऱ्या महिला मेळाव्याबाबत जास्तीत जास्त महिला कार्यक्रमासाठी घेऊन याबाबत विचारविनिमय करण्यात आला. त्यांची व्यवस्था, पार्किंग व्यवस्था याबाबत प्रांत मॅडम यांनी सविस्तर सर्वांना सूचना केल्या आहेत.
या मीटिंगसाठी सीडीपीओ आतार मॅडम, नातेपुतेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर, अकलूजचे मुख्याधिकारी दयानंद गोरे, तालुका सदस्य सतीश सपकाळ, महाळुंग नगरपंचायतीचे प्रतिनिधी पंचायत समितीच्या वावरे मॅडम आदी उपस्थित होते. यावेळी प्रांत मॅडम यांनी सर्वांनी मिळून केलेल्या प्रयत्नामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत पोहोचता आले याबद्दल सर्वांचे विशेष कौतुक केले. तालुकाध्यक्ष यांनी तालुकाभर दौरा करून योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी बँकाधिकाऱ्यासमवेत तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, लाडक्या बहिणी, संदर्भात असणाऱ्या सर्व अधिकाऱ्याबरोबर केलेले प्रयत्न कौतुकास्पद असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.