माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथील ग्रामस्थांच्या विरोधात अखेर पोलिसांनी दाखल केला गुन्हा
मतदान प्रक्रियेसाठी पुढाकार घेणाऱ्या मारकडवाडीतील 17 जणांसह अन्य 100 ते 200 ग्रामस्थांच्या विरोधात गुन्हा नोंद
नातेपुते (बारामती झटका)
मारकडवाडी ता. माळशिरस येथील ग्रामस्थांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावर परिणाम करण्याच्या उद्देशाने ईव्हीएम मशीन संदर्भात अफवा पसरवून फेर मतदानाची तरतूद नसताना प्रशासनाचे आदेश डावलल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच बॅलेट पेपरवर मतदान करण्यासाठी नागरिकांना आवाहन करून भीती निर्माण करत समाजात द्वेषाची भावना निर्माण केल्याचाही आरोप ग्रामस्थांवर करण्यात आला आहे. त्यामुळे मारकडवाडी ग्रामस्थांवर नातेपुते पोलीस स्टेशन येथे बीएनएस 353(1) (ब), 189 (1), (2), 190, 223 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 प्रमाणे नातेपुते पोलीस ठाण्यात सर्व आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
आरोपिंची नावे :-
मारकडवाडी गावातील ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ 1) संजय हरिभाऊ वाघमोडे, 2) राजेद्र अंकुश मारकड, 3) वैभव वाघमोडे, 4) विजय वाघमोडे, 5) विलास आद्रट, 6) रणजित जिजाबा मारकड, 7) लक्ष्मण सिताराम मारकड, (8) सर्जेराव बाबुराव लोखंडे, (9) संदिपान आण्णा मारकड, 10) अमित वाघमोडे, 11) दत्तु राघु दडस, 12) आबा नाना मारकड, 13) बबन दादा वाघमोडे, 14) मारुती शंकर रणदिवे, 15) नानासाहेब मारकड, 16) संजय नरळे, 17) शरद कोडलकर सर्व रा. मारकडवाडी व इतर 100 ते 200 लोकांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.