माळशिरस तालुक्यातील मतदार श्रेयवादापेक्षा विकासकामांना प्राधान्य देऊन लोकप्रतिनिधींच्या पाठीमागे ठाम भूमिका…

माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी भूमिपुत्रापेक्षा विकासपुत्र अशी कामगिरी बजावली आहे.
माळशिरस (बारामती झटका)
माढा लोकसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर व भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते या दोन लोकप्रतिनिधींनी माळशिरस तालुक्यात भूमिपुत्रापेक्षा विकासकार्य करून विकासपुत्र अशी कामगिरी बजावलेली आहे. माढा लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत माळशिरस तालुक्यातील मतदारांनी श्रेयवादापेक्षा विकासकामांना प्राधान्य देऊन खासदार व आमदार लोकप्रतिनिधींच्या पाठीमागे ठाम भूमिका ठेवलेली आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या मार्गदर्शनाखाली माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणारी व जिव्हाळ्याची असणारी प्रलंबित निरा देवधर योजना या योजनेला कागदावरून मृगजळ वाटणारी योजना प्रत्यक्षात मार्गी लावून कामास गती आलेली आहे. माळशिरस तालुक्यातील १६ गावांचा समावेश होता. प्रलंबित असणाऱ्या उर्वरित १६ गावांचा समावेश करून ३२ गावांचा कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न सोडविलेला आहे.
इंग्रज कालीन प्रलंबित असणारा लोणंद-फलटण-पंढरपूर रेल्वेचा प्रश्न निकाली काढलेला आहे. लोणंदपासून फलटणपर्यंत रेल्वेचे काम पूर्ण झालेले आहे. फलटणपासून पंढरपूरकडे जाणाऱ्या रेल्वेचा सुद्धा प्रश्न मिटलेला आहे. आचारसंहितेमुळे उद्घाटन रेंगाळलेले आहे, तोही प्रश्न निवडणुकीनंतर सुटणार आहे. याचबरोबर केंद्रातील विविध योजना माळशिरस तालुक्यात आणलेल्या आहेत.
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्याच्या वंचित भागाला न्याय देण्याचे काम केलेले आहे. ४० वर्षाचा विकासाचा प्रलंबित अनुशेष भरून काढलेला आहे. अनेक विकासकामांना निधी आणलेला आहे. सर्वसामान्य जनतेला जनता दरबाराच्या माध्यमातून व्यक्तिगत व सार्वजनिक कामे केलेली आहेत. माणसाचा कोणताच अवयव शिल्लक राहिलेला नसेल, अशी गोरगरीब व सर्वसामान्य जनतेची मोफत ऑपरेशन करून आरोग्यदूत असे जनतेमधून संबोधले जाते. विकासाची दमदार कामगिरी केलेली असल्याने दमदार आमदार राम सातपुते अशी समाजामध्ये ओळख कार्यातून निर्माण केलेली आहे. माढा लोकसभा मतदार संघामध्ये अनेक नेते व कार्यकर्ते श्रेय वादात गुंतलेले आहेत. मात्र, माळशिरस तालुक्यातील मतदार श्रेयवादापेक्षा लोकप्रतिनिधींनी केलेल्या विकासकामांना प्राधान्य देऊन माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या पाठीमागे ठाम भूमिका असल्याची भावना सर्वसामान्य जनता व मतदार यांच्यामधून बोलली जात आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.