माळशिरस तालुक्यातील नऊ जिल्हा परिषद गटांपैकी चार जिल्हा परिषद गट आरक्षित….

माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यात पूर्वी 11 जिल्हा परिषद गट व 22 पंचायत समिती गण होते. नगरपंचायत व नगरपरिषदेमुळे दोन जिल्हा परिषद गट कमी होऊन 9 जिल्हा परिषद गट व 18 पंचायत समिती गण तयार झालेले आहेत. नऊ जिल्हा परिषद गटांपैकी अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या अनुषंगाने चार जिल्हा परिषद गट अनुसूचित जातीसाठी आरक्षित होणार आहेत. त्यामध्ये माळीनगर, बोरगाव, वेळापूर, दहिगाव अशा चार जिल्हा परिषद गटांचा आरक्षितमध्ये समावेश होणार आहे.
सोलापूर जिल्ह्यामध्ये 68 जिल्हा परिषद गट आहेत. त्यामधील दहा जिल्हा परिषद गट अनुसूचित जातीसाठी आरक्षित होणार आहेत. त्यामध्ये माळशिरस तालुक्यातील चार जिल्हा परिषद गटांचा समावेश होणार असल्याने माळशिरस तालुक्यातील राजकीय चित्र वेगळेच झालेले आहेत. अनेक जिल्हा परिषद सदस्य इच्छुक होते, त्यांच्या आशा मावळणार आहेत.
2011 च्या जनगणनेनुसार चार जिल्हा परिषद गट आरक्षित होणार असून तीन पंचायत समिती गण अनुसूचित जातीसाठी आरक्षित होणार आहेत. त्यामध्ये माळीनगर, बोरगाव, दहिगाव या पंचायत समिती गणांचा समावेश होईल, अशी जनगणनेनुसार अनुसूचित जातीसाठी आरक्षित राहील.
नऊ जिल्हा परिषद गटांपैकी चार जिल्हा परिषद गट अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्यानंतर पाच जिल्हा परिषद गट उर्वरित राहत आहेत. त्यामध्ये दोन महिला व दोन ओबीसी असू शकतात. एक सर्वसाधारण राहू शकते, अशी माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद गटाची व पंचायत समिती गणाची राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे.
13 ऑक्टोंबर रोजी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाचे आरक्षण सोडत होणार आहे याकडे माळशिरस तालुक्याचे विशेष लक्ष लागून राहिलेले आहे..
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



