माळशिरस तालुक्यातील पुर्व भागातील तीन नेत्यांना सोलापूर जिल्हा कार्यकारिणीमध्ये स्थान दिल्याने कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले
श्रीपूर (बारामती झटका)
आरपीआय आठवले गट सोलापूर जिल्हा कार्यकारिणीमध्ये माळशिरस तालुक्यातील पुर्व भागातील तीन नेत्यांना संधी दिल्याने कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. ज्येष्ठ नेते शामराव भोसले यांना जिल्हा उपाध्यक्ष ज्येष्ठ नेते तुकाराम बाबर यांना जिल्हा संघटक तर ज्येष्ठ नेते भारत आठवले यांना जिल्हा सचिव म्हणून घेण्यात आले आहे. काल महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या नेतृत्वाखाली व सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या उपस्थीतीत सोलापूर जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली. त्यात या तिघांना जिल्हा कार्यकारिणीमध्ये घेतल्याचे जाहीर केले. प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर पक्षाचे काम जोमाने सुरू आहे. जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांना संघटीत करून पक्ष वाढीसाठी प्रत्येक कार्यकर्ता, नेता यांच्यावर जबाबदारी टाकली आहे.
ज्येष्ठ नेते शामराव भोसले, ज्येष्ठ नेते तुकाराम बाबर, ज्येष्ठ नेते भारत आठवले हे गेली पस्तीस दलित पँथरमध्ये कार्यरत आहेत. सामाजिक, राजकीय पातळीवर ते नेहमी आघाडीवर राहिले आहेत. पक्षाचे आदेशानुसार जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्व कार्यक्रम, आंदोलन, मोर्चा, धरणे आंदोलन यात ते नेहमी सक्रिय राहुन सामाजिक लढा देत आहेत. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली तन-मन-धन वेचून प्रसंगी अनेक हालअपेष्टा, कष्ट सोसून निळा झेंडा व पक्ष हाच आपला जीवनसाथी या न्यायाने ते सदैव चळवळ व आंबेडकरी विचार पुढे घेऊन जात आहेत.
मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढा गायरान प्रश्न दलितांवरील वाढते अन्याय, अत्याचार, हल्ले या विरोधात सामाजिक लढा जागृत ठेऊन शासनदरबारी आवाज उठवण्यासाठी ते तसूभरही कमी पडले नाहीत. भोसले, बाबर, आठवले यांची निवड झाल्याबद्दल जिल्ह्यातून, तालुक्यातून अनेक मान्यवरांनी सामाजिक, राजकीय क्षेत्रातील नेत्यांनी कार्यकर्त्यांनी यांचे स्वागत व अभिनंदन केले आहे. त्यांचे सत्कार व स्वागत ठिकठिकाणी करण्यात आले. सर्वांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.