माळशिरस तालुक्यातील तोंडले येथे उद्या आरपीआय आठवले गट शाखेचे उद्घाटन

श्रीपूर (बारामती झटका)
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट शाखेचे उद्या संध्याकाळी साडेसहा वाजता तोंडले येथे भव्य पध्दतीने उद्घाटन होणार असल्याची माहिती आरपीआयचे माळशिरस तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे यांनी दिली आहे. या उद्घाटन कार्यक्रमाला माळशिरस तालुका कार्यकारिणी जिल्ह्याचे पदाधिकारी व ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित रहाणार आहेत. मिलिंद सरतापे यांनी तालुका अध्यक्ष पद स्वीकारले पासून आरपीआयचे काम मोठ्या हिमतीने सुरू केले आहे. कार्यकर्ते जोडण्याचे व गाव तिथे आरपीआयच्या शाखा काढण्यासाठी सरतापे प्रामाणिक प्रयत्न करत आहेत.
आरपीआय कार्यकर्त्यांची दरमहा मासिक आढावा बैठक घेऊन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व पक्षाचे राष्ट्रिय अध्यक्ष ना. रामदास आठवले व प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या आदेशानुसार पक्षाचे ध्येय धोरण, उपक्रम, सामाजिक, राजकीय भूमिका तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी तालुका अध्यक्ष सक्रिय राहुन सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालुका आरपीआय आठवले गटाचा बालेकिल्ला कायम ठेवण्यासाठी लढा देत आहेत. पक्षाच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक सामाजिक, राजकीय प्रश्नांवर आंदोलन, मोर्चा, धरणे व निवेदन देऊन प्रश्न सोडवण्यात ते यशस्वी झाले आहेत. अनेक विषयांवर ते कार्यकर्त्यांना बरोबरीने घेऊन पक्षाचे काम प्रामाणिकपणे व नेटाने चालवत आहेत.
माळशिरस तालुका असा एकमेव तालुका असेल कि आरपीआयचे काम व सर्व जबाबदारी, भुमिका वेळच्यावेळी पार पाडून आरपीआय आठवले गटाची ताकद व नावलौकिक वाढवला जात आहे. तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे यांनी पुर्ण वेळ आरपीआय आठवले गट या पक्षासाठी दिला आहे, नव्हे त्यांनी स्वतःला झोकून दिले आहे. माळशिरस तालुक्यातील प्रत्येक शहर, गाव, खेड्यात, वस्त्या-वाड्यात आरपीआयचे निशाण निळा झेंडा डौलाने फडकवत ठेवण्याचे काम मिलिंद सरतापे करताना दिसतात. दर महिन्याला तालुक्यातील गावात, खेड्यात, शहरात आरपीआयची शाखा काढली जात आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.