माळशिरस वकील संघटना विधीगंध क्रिकेट स्पर्धेचे मानकरी

माळशिरस (बारामती झटका)
विधीगंध क्रिकेट असोसिएशन सोलापूर आणि सोलापूर जिल्हा वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या विधीगंध क्रिकेट स्पर्धेमध्ये माळशिरस येथील वकील संघटनेने गतवर्षी प्रमाणे याही वर्षी सोलापूर जिल्ह्यात मानाचा समजला जाणाऱ्या विधीगंध क्रिकेट स्पर्धेमध्ये विजय मिळवून माळशिरस वकील संघटनेने जिल्ह्यामध्ये सलग विजयाचा दबदबा पुन्हा एकदा निर्माण केला.
यानिमित्ताने माळशिरस बार असोसिएशनच्या वतीने विजेत्या माळशिरस वकील संघाचा सत्कार करण्यात आला. यावेळी माळशिरस वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. व्ही. टी. पिसाळ, सचिव ॲड. सुमित सावंत, सहसचिव ॲड. योगेश लोखंडे यांसह माळशिरस वकील संघटनेचे ज्येष्ठ विधीज्ञ व सह सदस्य उपस्थित होते.
यावेळी विजेत्या संघाचे कर्णधार ॲड. एस. इ. वाघमोडे, ॲड. एन. एच. पिसे, ॲड. डी. एस भोसले, ॲड. डी. एम. वाघमोडे, ॲड. आर. एस. जगदाळे व सर्व खेळाडू सदस्य यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी ॲड. एस. इ. वाघमोडे, ॲड. एन. एच. पिसे यांनी मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. सुमित सावंत यांनी केले तर आभार ॲड. योगेश लोखंडे यांनी मानले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



