माळशिरस वकिल संघटनेमार्फत संविधान दिन उत्साहात साजरा
माळशिरस (बारामती झटका)
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त माळशिरस वकिल संघटनेच्या वतीने माळशिरस न्यायालयातील वकील संघाच्या कार्यालयामध्ये मोठ्या उत्साहात संविधान दिन साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमावेळी वकील संघटनेच्या अध्यक्षा ॲड. मोहिनी देव, उपाध्यक्ष ॲड. राहुल लवटे, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. माधव मिराजदार, ॲड. एस. बी. पाटील, ॲड. डी. एन. काळे, ॲड. आर. एस. वाघमोडे, ॲड. जी. पी. कदम आदी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व भारतीय संविधानाच्या प्रतीचे पूजन करण्यात आले. व सामुदायिक संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना ॲड. सुयश सावंत व ॲड. वैभव धाईंजे यांनी संविधानाचे मूल्य, जोपासना व संविधानाच्या साक्षरतेच्या गरजेवरती भाष्य करून वक्तृत्व सदर केले.
सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक ॲड. भारत गोरवे यांनी केले तर सूत्रसंचालन ॲड. सुमित सावंत यांनी केले. सदर कार्यक्रमास माळशिरस वकील संघटनेचे वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ॲड. धनंजय बाबर, ॲड. भारत गोरवे, ॲड. सुमित सावंत, ॲड. अभिषेक चंदनशिवे, ॲड. वैशाली कांबळे, ॲड. मनोज धाईंजे यांनी परिश्रम घेतले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.