माळशिरस वकिलांकडून संविधानाच्या जागृतीसाठी राज्यस्तरीय पथनाट्य आणि रांगोळी स्पर्धेचे आयोजन
माळशिरस (बारामती झटका)
जागर संविधानाचा अभियानाअंतर्गत भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यस्तरीय पथनाट्य व रांगोळी स्पर्धा २०२४ या स्पर्धेचे आयोजन माळशिरस वकिलामार्फत करण्यात आले असून त्याची सूरुवात वकिल संघटनेच्या अध्यक्षा सौ. मोहिनी देव यांच्या हस्ते माळशिरस वकिल संघटनेच्या कार्यालयात झाले. सदर स्पर्धेच्या विजेत्यांसाठी बक्षिसे पुढीलप्रमाणे –
पथनाट्य स्पर्धेसाठी
पहिले बक्षीस : १०,०००/-
स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र
दुसरे बक्षीस : ७,०००/-
स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र
तिसरे बक्षीस : ५,०००/-
स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र
रांगोळी स्पर्धेसाठी
पहिले बक्षीस : 1HP आटा चक्की
स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र
दूसरे बक्षीस : मिक्सर ग्राईंडर
स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र
तिसरे बक्षीस : डिनर सेट
स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.
प्रवेश विनामुल्य राहणार असून स्पर्धकांना वयाची व शिक्षणाची अट नाही. नाव नोदणीची अंतिम तारीख १५ जानेवारी २०२५ असून ही स्पर्धा दि. १९/०१/२०२५ रोजी सकाळी ९.०० वा. माळशिरस येथे सुरू होईल व स्पर्धेचा निकाल व पारितोषिक वितरण दि. २५/०१/२०२५ रोजी करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक सहभागी स्पर्धकाला / संघाला प्रमाणपन्न देण्यात आल्याची माहिती आयोजक समितीचे ॲड. सुमित सावंत आणि ॲड. धनंजय बाबर यांनी दिली आहे.
आयोजक समितीमध्ये ॲड. सुनिता सातपुते, ॲड. रजनी गाडे-सोनवळ, ॲड. धनंजय बाबर, ॲड. अमृत भोसले, ॲड. सुमित सावंत, ॲड. भारत गोरवे, ॲड. नितीन भोसले, ॲड. वैभव धाईजे, ॲड. अजिंक्य नवगिरे, ॲड. सुयश सावंत, ॲड. धैर्यशिल भोसले, ॲड. वैशाली कांबळे, ॲड. मनोज धाईंजे, ॲड. अभिषेक चंदनशिवे, ॲड. निलेश जाधव, ॲड. दत्तात्रय सावंत व सर्व सन्माननीय माळशिरस वकील संघटना सदस्य, ता. माळशिरस, जि. सोलापूर यांचा समावेश आहे.
सदर स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी पुढील नंबरवर संपर्क साधावा –
ॲड. सुमित सावंत मो. 9970944991
ॲड. भारत गोरवे मो. 9850736190
ॲड. सुयश सावंत मो. 8483844049
ॲड. वैशाली कांबळे मो. 8329525003
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
gluco6 reviews : https://gluco6reviews.usaloves.com/
Blue Techker This was beautiful Admin. Thank you for your reflections.
Blue Techker I like the efforts you have put in this, regards for all the great content.