माळशिरस विधानसभा अनुसूचित जाती मतदार संघात 12 उमेदवार आपले नशीब आजमावणार

भाजपचे राम सातपुते व राष्ट्रवादीचे उत्तमराव जानकर यांच्यात प्रमुख लढत होणार
माळशिरस (बारामती झटका)
२५४, माळशिरस (अ.जा.) विधानसभा मतदारसंघात २५ उमेदवारापैकी आज अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिवशी १३ अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतल्याने निवडणुकीच्या रिंगणात ५ प्रमुख पक्षांसह ७ अपक्ष असे १२ उमेदवार राहिले आहेत.
माळशिरस विधानसभा मतदारसंघ निवडणुकीच्या प्रक्रियेत आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी २५ पैकी शैलेश कोतमिरे, विकास धाईंजे, ज्ञानेश्वर काटे, धनंजय साठे, अतुल सरतापे, नागेश जाधव,प्रकाश नवगिरे, सोमनाथ भोसले, मकरंद साठे, नंदकुमार साळवे, शरद सावंत, अनिल साठे, प्रेमसिंह कांबळे या १३ अपक्षांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले असुन १२ उमेदवार निवडणुक रिंगणात राहिले आहेत.
यामधे उत्तम जानकर (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष), राम सातपुते (भाजप), सुरज सरतापे (बसपा), राज कुमार (बहुजन वंचित आघाडी), प्रा. डॉ. सुनिल लोखंडे (राष्ट्रीय समाज पक्ष) या प्रमुख पक्षासह शरद सावंत, अरुण धाईंजे, रमेश नामदास, मनोजकुमार सुरवसे, सुधीर पोळ, कुमार लोंढे, दादा लोखंडे हे ७ अपक्ष उमेदवार असे एकुण १२ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.