ताज्या बातम्याराजकारणसामाजिक

माळशिरस विधानसभा निवडणुकीसाठी महत्वाचे बदल….

पात्र मतदार मतदानापासुन वंचीत राहु नये म्हणुन मतदान केंद्रांमध्ये बदल – विजया पांगारकर

माळशिरस (बारामती झटका)

आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये एकही पात्र मतदार मतदानापासुन वंचीत राहु नये, या उद्देशाने माळशिरस विधानसभा मतदार संघात सुसुत्रीकरणाअंतर्गत तीन मतदान केंद्राचे स्थानात बदल करण्यात आले. सात नवीन मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच ७७ मतदान केंदातील मतदारांचे विलीनीकरण करण्यात आल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी पत्रकार परीषदेमध्ये दिली.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजीत पत्रकार परीषदेमध्ये प्रातांधिकारी विजया पांगारकर यांनी मतदार केंद्राच्या नावातील बदल, केंद्रांच्या स्थानातील बदल, मतदार संघातील नवीन केंद्र आणि प्रत्येक मतदान केंद्रावर समान मतदार संख्येसाठी विलीन मतदार केंद्रांची माहिती दिली. यावेळी निवडणुक नायब तहशिलदार प्रविण सुळ व अव्वल कारकुन प्रविण शिंदे ऊपस्थित होते.

नाव क्रमांक बदल – एकुण 6 मतदान केंद्र-
जाधववाडी-110, पानीव-168 (नवीन क्रमांक-170), वेळापुर-296(नवीन क्र.301), तांदुळवाडी-325,326,327(नवीन क्र.331,332,333)

या तिन मतदान केंद्रांच्या स्थानात बदल-
देशमुखवाडी-4, पठाणवस्ती (वाणीवाडी)-203, (नविन क्र.205, )दसुर-334(नविन क्र.-340)

लोकसभा निवडणुकीमध्ये असलेल्या ३३८ मतदान केंद्रामध्ये नवीन सात केंद्राची वाढ करण्यात आली.
नविन मतदान केंद्र – 7
माळशिरस 137,142, मगरवाडी (गारवाड), 207, सुळेवाडी-210, अकलुज (दत्तनगर)-271, काळमवाडी-315, उघडेवाडी-345

77 मतदान केंद्रांचे झाले विलीनीकरण
मतदान केंद्रांवरील मतदार संख्येत असणारी विषमता टाळण्यासाठी सरासरी 1350 ते 1500 मतदारांसाठी एक मतदान केंद्र व्हावे, यासाठी 77 मतदान केंद्रांचे विलीनीकरण करण्यात आले.

विलिन मतदान केंद्राची संख्या व क्रमांक (जुने मतदान केंद्र क्रमांक)
कुरबावी- 6 व 7, डोंबाळवाडी 8 व 9, कारुंडे 17 व 18, एकशिव 28 व 29
नातेपुते – 47, 52, 53, 54, 58, 59, 60, फोंडशिरस 70, 71, 72, 75, 77, फडतरी 81 व 82, मांडवे 89 व 90, सदाशिवनगर 105 व 106,, तिरवंडी 127 व 129,
माळशिरस 135, 136, 137, 138, 139, 140, 141, 142, 144, 145,
तरंगफळ-164 व 165, यशवंतनगर 182 व 185, सुळेवाडी 205 व 206,
पिलिव 207, 209, 210, 212, पिसेवाडी 223 व 225, माळेवाडी अकलुज 230 व 231, अकलुज, 248, 249, 255, 266
संग्रामनगर 260, 261, 263, 264, तांबवे 277 व 279, वेळापूर 293, 294, 297, 300, कोळेगाव-316, 317, 318, तांदुळवाडी 322 व 324, धानोरे 329 व 330, दसुर 333 व 334, उघडेवाडी 337 व 338

लोकसभा निवडणुकीत वगळलेल्या मतदारांची B.L.O. करणार चौकशी
यावेळी विजया पांगारकर यांनी लोकसभा निवडणुकीत वगळण्यात आलेल्या 8 हजार 500 मतदारांची चौकशी करण्यात येणार आहे. प्रत्येक मतदाराच्या घरी BLO जावुन चौकशी करणार आहेत. मतदार मयत असेल तर मयताचा दाखला आवश्यक असल्याचे सांगुन चुकीने एखादा मतदार यादीतुन वगळण्यात आला असेल तर ६ नंबरचा फाॕर्म भरण्याच्या सुचना त्यांनी दिल्या.

महिलांची नोंदणी होणे आवश्यक
मतदार यादीमध्ये महिलांचे सरासरी प्रमाण सोलापुर जिल्ह्यात 937 तर माळशिरस तालुक्यात 929 इतके आहे. तालुक्यातील 65 गावात महिलांचे मतदार यादीत असलेली अल्प नोंद ही लोकशाहीसाठी चांगली नाही. भविष्यात शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी महिलांचे मतदार यादीमध्ये नाव असणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यासाठी ज्या महिलांचे नावे मतदार यादीमध्ये नाहीत त्यांनी तात्काळ नोंद करुन घेण्याचे आवाहन प्रातांधिकारी विजया पांगारकर यांनी केले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

12 Comments

  1. Ny weekly I’m often to blogging and i really appreciate your content. The article has actually peaks my interest. I’m going to bookmark your web site and maintain checking for brand spanking new information.

Leave a Reply

Back to top button