माळशिरस विधानसभा पूर्ण ताकतीने लढविण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार….

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या श्रीराम बंगला निवासस्थानी कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्णय….
माळशिरस ( बारामती झटका)
लोकसभेच्या निवडणूक निकालानंतर भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या मांडवे येथील श्रीराम बंगला निवासस्थानी कार्यकर्त्यांची बैठक व भेटगाठ संपन्न झाली. यावेळी माळशिरस विधानसभेची निवडणूक पूर्ण ताकतीने लढविण्याचा कार्यकर्त्यांनी निर्धार केलेला आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप व महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार राम सातपुते यांनी निवडणूक लढविलेली होती. सदरच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर माळशिरस तालुक्यातील कार्यकर्त्यांची भेटीगाठी, अडीअडचणी व सुसंवाद साधण्याकरता निवासस्थानी बैठकीचे आयोजन केलेले होते. यावेळी भारतीय जनता पक्ष व महायुतीचे घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केलेली होती. माळशिरस तालुक्यात मोहिते पाटील व मोहिते पाटील विरोधी गट एकत्र येऊन सुद्धा अपेक्षेप्रमाणे मते माढा लोकसभेचे उमेदवार पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मिळालेली आहेत. त्यामुळे माळशिरस तालुक्यामध्ये मोहिते पाटील व मोहिते पाटील विरोधक एकत्र येऊन सुद्धा महायुतीचे कार्यकर्ते यांनी खिंड लढवून मताधिक्य टिकवून ठेवलेले होते.

अनेक गावांमध्ये भारतीय जनता पक्षाचे व महायुतीच्या कार्यकर्ते यांनी निष्ठेने काम करून भक्कमपणे महायुतीच्या पाठीशी उभे राहिलेले होते. सोलापूर लोकसभेला लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांचा पराभव झाल्यानंतर मोहिते पाटील व पारंपारिक मोहिते पाटील विरोधी गटाने वेगवेगळ्या प्रकारे सोशल मीडियावर अपप्रचार सुरू केलेला आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी निवासस्थानी भेटीच्या दरम्यान अनेक राजकीय घडामोडींवर चर्चा करण्यात आली. भविष्यामध्ये ‘इट का जवाब पत्थर से देंगे’, अशा कार्यकर्त्यांच्या संतप्त भावना व्यक्त होत होत्या. कार्यकर्त्यांनी राजकीय रणनीती आमदार राम सातपुते यांच्यासमोर मांडलेली होती. यावेळी लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी सर्व कार्यकर्त्यांना विश्वास देऊन भविष्यात आपल्या मनामध्ये आहे तेच होईल, असा शब्द दिल्यानंतर कार्यकर्त्यांच्या मनामध्ये उत्साह निर्माण झालेला असून आत्तापासूनच विधानसभेच्या निवडणुकीला कार्यकर्ते जोमाने लागलेले आहेत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.