मोहिते पाटील गटाचे तीन पिढ्या निष्ठावान असणारे आसबे परिवार भाजपच्या वाटेवर…

संग्रामनगर जिल्हा परिषद गटात मोहिते पाटील गटाला खिंडार….
अकलूज (बारामती झटका)
मोहिते पाटील गटाचे तीन पिढ्याचे निष्ठावान असणारे संग्रामनगर येथील आसबे परिवार भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आरोग्यदूत माजी आमदार राम सातपुते यांच्या कार्यकर्तुत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षामध्ये लवकरच जाहीर प्रवेश करणार आहेत. माजी आमदार राम सातपुते यांच्या श्रीराम बंगला निवासस्थानी संग्रामनगर गावचे माजी उपसरपंच व अकलूज शिक्षण प्रसारक मंडळाचे कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे माजी चेअरमन श्री. दत्तात्रय लक्ष्मण आसबे व श्री. सागर दत्तात्रय आसबे यांनी भेट घेतलेली आहे.
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या समवेत ह. भ. प. विठोबा महादेव आसबे यांनी काम केलेले आहे. त्यानंतर लक्ष्मणराव विठोबा आसबे उर्फ तात्या आसबे यांनी विजयसिंह मोहिते पाटील व जयसिंह मोहिते पाटील यांच्या समवेत आपले पूर्ण आयुष्य प्रामाणिकपणे व निष्ठेने घालवलेले आहे. आसबे तात्या यांनी अकलूज विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन, प्रताप क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील जयंती समारंभ समितीचे उपाध्यक्ष, व अनेक सहकारी संस्थांवर संचालक पदावर काम केलेले होते.
आसबे घराणे यांनी मोहिते पाटील यांना प्रामाणिकपणे साथ दिलेली आहे. लक्ष्मण तात्या यांच्या पश्चात आसबे परिवार यांना मोहिते पाटील परिवार यांनी साथ देण्याऐवजी अडचणीच निर्माण केलेल्या आहेत. त्यामुळे तिसऱ्या पिढीतील दत्तात्रय लक्ष्मण आसबे व त्यांच्या परिवारातील सदस्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
सध्या स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे. आसबे परिवार यांचा संग्रामनगर जिल्हा परिषद गटामध्ये दांडगा जनसंपर्क आहे. नातेवाईक व मित्रपरिवार मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे संग्रामनगर जिल्हा परिषद गटामध्ये आसबे परिवार यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश केल्यानंतर भारतीय जनता पक्षाची ताकद वाढणार आहे.
माजी आमदार राम सातपुते व दत्तात्रय आसबे व सागर आसबे यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा झालेली आहे. लवकरच महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत जाहीर पक्षप्रवेश होणार आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



