माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्याकडून माळशिरस आणि नातेपुते नगरपंचायतीसाठी दमदार निधी मंजूर
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत माळशिरस आणि नातेपुते नगरपंचायतीसाठी दमदार निधी मंजूर करवून आणला आहे. त्यामध्ये माळशिरस नगर पंचायतीसाठी २.२० कोटी तर नातेपुते नगर पंचायतीसाठी २.८० कोटी रुपयांचा निधी मंजूर करवून आणला आहे.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी तालुक्यामध्ये विविध विकासकामे केली आहेत. विविध योजना मंजूर करवून आणल्या आहेत. त्यामुळे माळशिरस आणि नातेपुते नगर पंचायत परिसरातील जनतेमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
माळशिरस नगरपरिषद क्षेत्रातील विकास कामे व रक्कम –
प्रभाग क्र. ४ मध्ये ६१ फाटा श्रीनाथ मंदिर येथे लादीकरण करणे २० लाख रु., प्रभाग क्र. ३ मध्ये ६१ फाटा ते वाघमोडे वस्ती शाळा रस्ता करणे २२ लाख रु., माळशिरस नगरपंचायत हद्दीत व्यायाम शाळा हॉल बांधणे २२ लाख रु., प्रभाग क्र. ८ मध्ये मेडद रोड ते बबन थोरात वस्ती पर्यंत लादीकरण करणे ८ लाख रु., प्रभाग क्र.८ मध्ये ५८ फाटा कॅनॉल ते वाघमोडे थोरात वस्ती पर्यंत लादीकरण करणे ८ लाख रु., प्रभाग क्र. ८ मध्ये चिंचणी मायाक्का मंदिरासमोर सभामंडप बांधणे ७ लाख रु., प्रभाग क्र. ९ मध्ये पांढरे वस्ती ते तांबोळी वस्तीपर्यंत रस्ता करणे २२ लाख रु., प्रभाग क्र. ११ मध्ये लोहार गल्ली परिसरात लादीकरण करणे २२ लाख रु., प्रभाग क्र. १६ मधील चौगुले वस्ती येथील ज्ञानेश्वर महाराज मंदिर व सभा मंडप बांधणे १३ लाख रु., प्रभाग क्र. २ मधील महालक्ष्मी मंदिर परिसरात लादीकरण व संरक्षण भिंत बांधणे १३ लाख रु., प्रभाग क्र. २ मध्ये चौगुले वस्ती येथील हनुमान मंदिर परिसरात लादीकरण करणे आणि प्रभाग क्र. २ मध्ये नाना सरगर वस्ती येथे खडीकरण करणे १८ लाख रु., कमळ मळा येथील जय भवानी मंदिर येथे सभा मंडप बांधणे २५ लाख रु., प्रभाग क्र. ५ मध्ये लादीकरण करणे २२ वीस लाख रुपये असा एकूण २.२० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
नातेपुते नगरपरिषद क्षेत्रातील विकास कामे व रक्कम –
प्रभाग क्र. १ मधील दहिगाव रोड ते सुनील काळे वस्ती पर्यंत रस्ता करणे २२ लाख रु., प्रभाग क्र. १० मधील दहिगाव रोड ते उमाजी बोडरे वस्ती पर्यंत रस्ता करणे २३ लाख रु., प्रभाग क्र. १३ मधील दत्ता सोरटे यांचे घर ते उत्तम साळवे घर पर्यंत रस्ता करणे २२ लाख रु., प्रभाग क्र.१ मधील पंढरीनाथ राऊत वस्ती ते ढगे वस्ती पर्यंत रस्ता करणे २२ लाख रु., प्रभाग क्र. १४ मधील राजू खटावकर ते टिळक चौक पर्यंत रस्ता करणे २३ लाख रु., प्रभाग क्र. ५ मधील शिंदे वस्ती ते सय्यद वस्ती पर्यंत रस्ता करणे ५ लाख रु., प्रभाग क्र. ५ मधील मुलाणी वस्ती येथे बंदिस्त गटार करण्यासाठी ५ लाख रु., प्रभाग क्र. ५ मधील दस्तगीर काझी ते बबन पांढरे घरापर्यंत रस्ता करणे १५ लाख रु., प्रभाग क्र. १७ मधील विसावा चौक येथे पूल तयार करणे ४८ लाख रु., प्रभाग क्र. ३ येथे अभ्यासिका बांधण्यासाठी २३ लाख रु., प्रभाग क्र. २ मधील रुपनवर भाऊसाहेब घर ते डॉ. चौधरी घरापर्यंत रस्ता करणे २४ लाख रु., प्रभाग क्र. ९ मधील तलाठी ऑफिस रस्ता करण्यासाठी २३ लाख रु., प्रभाग क्र. १६ मध्ये रावळ घर ते सुनील ठोंबरे घर रस्ता करणे २५ लाख रु., असा एकूण २.८० कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Very well written! The points discussed are highly relevant. For further exploration, check out: LEARN MORE. Keen to hear everyone’s opinions!
This was a fantastic read. The analysis was spot-on. Interested in more? Check out my profile for more engaging discussions!