ताज्या बातम्याराजकारण

माळशिरस विधानसभेसाठी 39 उमेदवारांनी 35 नामनिर्देश पत्र दाखल केलेली आहेत, त्यापैकी सहा उमेदवारांनी दोन वेळा दाखल केलेले आहे.

माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस 254 अनुसूचित जाती विधानसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी माळशिरस विधानसभेसाठी 39 उमेदवारांनी 35 नामनिर्देश पत्र दाखल केलेली आहेत. त्यापैकी सहा उमेदवारांनी दोन वेळा नामनिर्देश पत्र दाखल केलेली आहेत.

शरद गेना सावंत अपक्ष, उत्तमराव शिवदास जानकर नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, विकास संदिपान धाईंजे नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, सुरज अशोक सरतापे बसपा, अरुण मनोहर धाईंजे अपक्ष, सोमनाथ अरुण भोसले अपक्ष, मकरंद नागनाथ साठे अपक्ष, प्रेमसिंह ज्ञानदेव कांबळे अपक्ष, रमेश अंकुश नामदास अपक्ष, मनोजकुमार उत्तम सुरवसे अपक्ष, नागेश आबा जाधव अपक्ष, राज यशवंत कुमार वंचित बहुजन आघाडी, अनिल गौतम नवगिरे अपक्ष, नागेश आबा जाधव अपक्ष, सुधीर अर्जुन पोळ अपक्ष, त्रिभुवन विनायक धाईंजे अपक्ष, त्रिभुवन विनायक धाईंजे (प्रहार जनशक्ती एबी फॉर्म अप्राप्त), कुमार आनंदा लोंढे अपक्ष, राम विठ्ठल सातपुते भारतीय जनता पार्टी, संस्कृती राम सातपुते (भारतीय जनता पार्टी एबी फॉर्म अप्राप्त), ज्ञानेश्वर मारुती काटे अपक्ष, अतुल श्रीमंत सरतापे अपक्ष, शरद गेना सावंत अपक्ष, दादा विश्वनाथ लोखंडे अपक्ष, नंदकुमार कृष्णाजी साळवे (आरपीआय आठवले गट एबी फॉर्म अप्राप्त), प्रकाश वामन नवगिरे अपक्ष, अनिल तानाजी साठे अपक्ष, शैलेश जनार्दन कोथमीरे अपक्ष, धनंजय तुकाराम साठे अपक्ष, लालासाहेब ज्ञानोबा आडगळे (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पर्यायी उमेदवार), प्रा. डॉ. सुनील सुखदेव लोखंडे राष्ट्रीय समाज पक्ष, किशोर शिवाजी सुळ अपक्ष, किशोर शिवाजी सूळ (भारतीय जनता पार्टी एबी फॉर्म अप्राप्त), उत्तम शिवदास जानकर अपक्ष, विकास संदिपान धाईंजे अपक्ष अशा व्यक्तींनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी विजया पांगारकर हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. त्यांना सहकार्य सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार सुरेश शेजुळ हे काम पाहत आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अकलूज उपविभागीय पोलीस उपअधीक्षक नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज, माळशिरस, नातेपुते, वेळापूर पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवलेला आहे. माळशिरस तालुका संवेदनशील असल्याने एसआरपी तैनात करण्यात आलेली आहे. उमेदवारी अर्ज शांततेत दाखल झालेले आहेत. चार तारखेला उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची तीन वाजेपर्यंत वेळ आहे. यानंतर माळशिरस तालुक्यातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button