माळशिरस विधानसभेसाठी एकही नामनिर्देशन पत्र आले नाही

माळशिरस (बारामती झटका)
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अनुषंगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून २५४ – माळशिरस (अ.जा.) विधानसभा मतदार संघ निवडणूककामी दि. २२ ते २९ आक्टोंबर या कालावधीत सकाळी ११.०० ते दुपारी ०३.०० वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी २५४ – माळशिरस (अ.जा.) विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी, माळशिरस विभाग अकलूज, सुजयनगर – १, अकलूज यांचे कार्यालयात नामनिर्देशनपत्र प्रांताधिकारी विजया पांगारकर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुरेश शेजूळ हे स्विकारणार आहेत. मात्र, आज दि. २२ ऑक्टोबर रोजी एकही नामनिर्देशन पत्र आले नाही.
मात्र त्या ठिकाणी १९ उमेदवार व उमेदवार प्रतिनिधी २८ नामनिर्देशन पत्र घेवून गेले आहेत. आज पहिला दिवस असून एकही नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले नाही. त्यामुळे पहिला दिवस हा निरंक गेलेला आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.