माळशिरस येथे ॲड. एम. एम. मगर यांच्या जंजिरा बंगल्यावर तिळ गुळ आणि गोड संवाद
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस येथे सालाबादप्रमाणे याहीवर्षी मकरसंक्रांतीनिमित्त दि. १४/०१/२०२५ रोजी सायंकाळी माळशिरस शहर व परिसरातील नागरिकांचा तिळ गुळ घ्या गोड बोला हा कार्यक्रम ॲड. एम. एम. मगर यांच्या जंजिरा बंगला येथे दिमाखात संपन्न झाला. ह्या कार्यक्रमाचे आयोजन आपला युवक शेतकरी फोरमचे संस्थापक अध्यक्ष ॲड. एम. एम. मगर साहेब यांनी केले होते. एकमेकांना संक्रांतीनिमित्त तिळ गुळ देणे, शुभेच्छा देणे, भेटी घेणे याचबरोबर ‘गोड संवाद’ ही साधला जातो. विविध स्तरातील अनेक नागरिक या सोहळ्याचा आनंद घेतात. यंदाचे हे १० वे वर्षे आहे.
‘तिळ गुळ आणि गोड संवाद’ या कार्यक्रमाच्या निमीत्ताने उपस्थित असलेले माळशिरसचे नुतन नगराध्यक्ष श्री. विजय बाजीराव देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. शिवाय जेष्ठ लेखक श्री. भागवत सावळाराम बावळे यांनी लिहिलेल्या ‘शिवसमर्थ’ या ओवीवजा पुस्तकांचे अनावरण देखील यावेळी करण्यात आले. तिळ गुळ घ्या, गोड बोला आणि गोड संवाद करा, यासाठी विविध राजकीय, सामाजिक, औद्योगिक, व्यापारी, वकील, डाॅक्टर आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यामध्ये माळशिरसचे माजी नगराध्यक्ष व भाजपचे नेते आप्पासाहेब देशमुख, आपला युवक शेतकरी फोरमचे संस्थापक ॲड. एम. एम. मगर साहेब, जेष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष ॲड. प्रभाकर कुलकर्णी, शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डाॅ. सुभाष देशमाने, डाॅ. सुरेश कुलकर्णी, डाॅ. संजय गोरे, डाॅ. संजय पंचवाघ, व्यापारी संघाचे पदाधिकारी पोपटशेठ देशमाने, माळी महासंघाचे पदाधिकारी श्री. रामभाऊ म्हस्के, भाजपचे नेते व समाजसेवक गंगाधर पिसे, प्रगतशील शेतकरी वामन वाघमोडे, मराठा समाजाचे नेते श्री. नंदुशेठ घाडगे, सुर्यवंशी सर, संतोष सांळुखे, विनोद (आप्पा) पवार, आपला युवक शेतकरी फोरमचे कायदेशीर सल्लागार ॲड. जी. पी. कदम, संघटक अभिजित पिसे, हाॅटेल फ्लॅश माउंटचे मालक शंकरराव ताम्हाणे व संत्यपान ताम्हाणे, सतिश लिबोणे, दिलिप लिबोणे, जेष्ठ नेते विजयराव खराडे, मुस्लिम संघटक इकबाल काझी शिवाय, आर.पी.आय. चे पदाधिकारी प्रदिप धाईजे, माजी जेलर संजय कुलकर्णी, ॲड. धाईजे सर, प्रिंटिंग प्रेस संघटक सुधीर ढवळे, शेतकी अधिकारी उमाकांत क्षीरसागर, सुप्रसिद्ध व्यापारी शेतकरी निवृत्ती करे, जेष्ठ नागरिक संघटनेचे सचिव मारुती सिद, भिकु पडळकर, चंद्रकांत शिंदे, बाळासाहेब सातपुते, ज्ञानदेव वनवे, निवृत्ती राऊत, महादेव जाविर, शंकर बिरलिंगे, विठ्ठल कोळेकर, दत्तात्रय वाघमोडे आदी मान्यवरांसह बहुसंख्य मंडळी व सर्व सामान्य नागरिक कार्यक्रमास उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे व्यवस्थापन व नियोजन सलिम पठाण, अभिजित पिसे, नवनाथ कार्वे, शौर्य कदम यांनी केले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.