माळशिरस येथे अज्ञात वाहनाच्या धडकेने दोघांचा मृत्यू एक जखमी
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस पोलीस ठाणे गु.र.नं.11/2024 बीएनएस कलम 106(1),281, 125(b), एम.व्ही. ॲक्ट 184, 134(A), 134(B) प्रमाणे फिर्यादी चैतन्य मल्हारी सर्जे वय ३८ वर्षे, व्यवसाय शेती, रा. देशमुख फाटा, 61 फाटा, माळशिरस, ता. माळशिरस, जि. सोलापुर, (मो. नं 9975303111) यांनी अज्ञात वाहन चालक यांच्या विरुद्ध
गुन्हा दाखल केला आहे. दि. 09/01/2025 रोजी सकाळी 05:30 वा ते 05:45 चे दरम्यान श्री. सिताराम महाराज आर्टस या दुकानाजवळ देववकीलवस्ती, माळशिरस ते अकलुज रोडवर माळशिरस येथे गुन्हा घडला. सदर गुन्ह्यातील अज्ञात वाहन यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये. चांगदेव किसन सर्जे (वय 55 वर्षे), रा. 61 फाटा, माळशिरस आणि दिलीप पंढरी कांबळे (वय 45 वर्षे), रा. नेवरे, ता. माळशिरस हे दोघे मयत झाले आहेत.
दाखल अंमलदार – मपोहेकॉ/1872 तांबळी मो.नं.9527786111, तपासिक अंमलदार – मा. सपोनि जानकर सो मो.नं.9029031907 हे या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.
याबाबत हकिकत अशी की, वरील तारीख वेळी व ठिकाणी माझे चुलते चांगदेव किसन सर्जे (वय 55 वर्षे), रा. 61 फाटा, माळशिरस, आणि दिलीप पंढरी कांबळे (वय 45 वर्षे), रा. नेवरे, ता. माळशिरस आणि शंकर बळीबा देशुमख (वय 46 वर्षे), रा. 61 फाटा, माळशिरस यांना कोणीतरी अज्ञात वाहनाने धडक देवुन निघुन गेला आहे. यामध्ये चांगदेव किसन सर्जे, दिलीप पंढरी कांबळे हे मयत झालेले आहेत व शंकर बळीबा देशुमख हे गंभीर जखमी झालेले आहेत. वगैरे मजकुराची फिर्याद दिल्याने गुन्हा रजिस्टर दाखल करून गुन्ह्याचा वर्दि रिपोर्ट मा. कोर्ट माळशिरस येथे पाठविण्याची तजवीज ठेवली आहे व गुन्ह्याचा पुढील तपास मा. प्रभारी अधिकारकी सो. यांचे आदेशान्वये सपोनि जानकर यांचेकडे दिला आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.