माळशिरस येथे बाळूमामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील फेम रामाण्णा म्हणजेच विक्रम जगताप (मेजर वासुंदेकर) यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन
कै. संभाजी वाघमोडे यांच्या आठव्या पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन, आरती, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन
माळशिरस (बारामती झटका)
कै. संभाजी भिवा वाघमोडे यांच्या आठव्या पुण्यस्मरणानिमित्त बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेतील रामाण्णा हे पात्र साकारलेले विक्रम सूर्यकांत जगताप उर्फ मेजर वासुंदेकर यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन रविवार दि. ३१/३/२०२४ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत मेन कॅनॉल नजीक, खंडोबा वस्ती (खोरे वस्ती), ता. माळशिरस, येथे करण्यात आले आहे.
कै. संभाजी वाघमोडे यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शेती व्यवसायावर आपल्या मुलांना आणि नातवंडांना घडविले. त्यांना चांगले संस्कार आणि उत्तम शिक्षण दिले. व स्वतःच्या पायावर उभा केले. कै. संभाजी वाघमोडे यांना श्रीमती पुतळाबाई धोंडीबा लांडगे आणि सौ. कमल रामचंद्र जानकर या दोन मुली तर भगवान संभाजी वाघमोडे, कै. मधुकर संभाजी वाघमोडे, आण्णा संभाजी वाघमोडे, बाळासो संभाजी वाघमोडे, रामचंद्र संभाजी वाघमोडे, लक्ष्मण संभाजी वाघमोडे अशी सहा मुले.
कै. संभाजी वाघमोडे यांच्या तिसऱ्या पिढीने उद्योग व्यवसायात प्रगती केली आहे. त्यामध्ये सचिन रामचंद्र वाघमोडे मार्केटींग मॅनेजर (केन्सो ॲग्रो इंडस्ट्रीज नाशिक), विष्णू अण्णा वाघमोडे (माजी ग्रामपंचायत सदस्य भांबुर्डी), दिपक रामचंद्र वाघमोडे मार्केटिंग मॅनेजर (धानुका ॲग्रीटेक लिमिटेड), वैभव लक्ष्मण वाघमोडे मार्केटिंग मॅनेजर (आदित्य सीड्स), सुरेश भगवान वाघमोडे (बी.सी.एस. पुणे), तानाजी बाळासो वाघमोडे (बी.सी.एस. पुणे), सुभाष मधुकर वाघमोडे असे एकूण १२ नातू, १० नाती ६० परतोंडे आहेत.
कै. संभाजी वाघमोडे यांचा अतिशय सुसंस्कृत परिवार आहे. त्यांच्या आठव्या पुण्यस्मरणानिमित्त समाज प्रबोधन व्हावं आणि श्री संत बाळूमामांचाही जागर व्हावा, यासाठी त्यांनी बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेतील रामाण्णा हे पात्र साकारलेले विक्रम सूर्यकांत जगताप यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन केले आहे. सदरच्या किर्तनाचे थेट प्रक्षेपण बारामती झटका यूट्यूब चॅनलवर करण्यात येणार आहे.
तरी नजरचुकीने कोणाला आमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून पुण्यस्मरण कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त वाघमोडे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
This article is fantastic! The perspective you shared is very refreshing. For more details on this topic, visit: DISCOVER MORE. What do others think?