माळशिरस येथे ज्ञानसेतू अभ्यासिका व करिअर मार्गदर्शन केंद्र व संघर्ष करिअर अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीराचे आयोजन
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठान संचलित, ज्ञानसेतू अभ्यासिका व करिअर मार्गदर्शन केंद्र, माळशिरस व संघर्ष करिअर अकॅडमी, माळशिरस यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन गुरुवार दि. १३/६/२०२४ रोजी सकाळी १० वा. पंचायत समिती सभागृह, माळशिरस येथे करण्यात आले आहे.
सदर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरात डॉ. अरुण अडसूळ मा. सदस्य महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मा. कुलगुरू पुणे विद्यापीठ, मनोज राऊत गटविकास अधिकारी पंचायत समिती माळशिरस, विजयराज चंदनकर कृषी अधिकारी एसबीआय, अमर जगताप राज्य विक्रीकर निरीक्षक, संतोष खेडकर पोलीस उपनिरीक्षक, विशाल भोसले पोलीस उपनिरीक्षक यांचे मार्गदर्शन होणार आहे.
तरी या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचा लाभ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठानचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.