ताज्या बातम्या
माळशिरस येथे सकल धनगर समाज बांधवांचा भव्य रास्ता रोको आंदोलन….

शेळ्या मेंढ्या चौकामध्ये आणून ढोल-वाद्यांसह गजी खेळून आंदोलन होणार….
माळशिरस (बारामती झटका)
धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी, यासाठी पंढरपूर येथे धनगर समाज बांधव उपोषणास बसलेले आहेत. धनगर समाज बांधवांच्या उपोषणाला पाठिंबा देण्याकरता माळशिरस येथील सकल धनगर समाज बांधवांच्या वतीने माळशिरस येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी चौक, 61 फाटा, पंढरपूर रोड, या ठिकाणी भव्य रास्ता रोको आंदोलन बुधवार दि. 18/09/2024 रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. असे माळशिरस पोलीस स्टेशन येथे सकल धनगर समाजाच्या वतीने शामराव गेना वाघमोडे यांनी निवेदन दिलेले आहे.


नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.