माळशिरस येथे संविधान जागर यात्रेचे जल्लोषात स्वागत.
माळशिरस (बारामती झटका)
संविधान जागर समिती महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने महाराष्ट्रभर जागर संविधान यात्रा फिरणार असून त्याची सुरुवात ९ ऑगस्ट रोजी महाड येथील चवदार तळ्यापासून झाली. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये देशभर भारतीय जनता पार्टी संविधान बदलणार असा अपप्रचार केल्याने अनुसूचित जाती व मागासवर्गीय समाजामध्ये संभ्रम निर्माण झाला होता तो दूर करून घटनेमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही व जो अपप्रचार चालू आहे त्याला उत्तर देण्यासाठी संविधान यात्रेचे आयोजन करण्यात आले असून ते महाराष्ट्रभर फिरणार आहे.
दि. १६ ऑगस्ट रोजी माळशिरस येथे माळशिरस विधानसभा मतदार संघाचे आमदार राम सातपुते यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर रॅलीची जंगी स्वागत नगरसेवक आकाश सावंत यांनी केले. यावेळी ज्येष्ठ नेते बुवा नाना धाईजे, राजू सावंत, दत्तू सावंत, यशवंत मोहिते यांच्यासह अनेक समाज बांधव उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमासाठी आलेले वाल्मीक निकाळजे व नितीनजी मोरे यांनी यावेळी समाजाला प्रबोधन केले. घटना ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली असून ती बदलण्याचा अधिकार कोणालाही नाही आणि भारतीय जनता पार्टी घटना बदलणार नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले. त्यांच्याबरोबर आलेले राजेंद्र गायकवाड, योजनाताई ठोकळे उपस्थित होते.
यावेळी संविधानाच्या प्रतिमेचे पूजन व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये यात्रेचे स्वागत करण्यात आले. तसेच मान्यवरांचा हार व फेटा बांधून जंगी स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक बाळासाहेब सरगर जिल्हाध्यक्ष भाजपा किसान मोर्चा तथा तालुकाध्यक्ष मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना माळशिरस तालुका यांनी केले.
यावेळी आकाश सावंत यांनी सांगितले की, माळशिरसमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक व्हावे, यासाठी नगरसेवक आबा धाईजे व शोभा धाईजे व मी आमदार राम सातपुते यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने सोलापूर जिल्ह्यातले भव्य स्मारक या ठिकाणी उभा राहणार असून त्यासाठी 75 लाख रुपयांचा निधी आमदार राम सातपुते यांनी दिला असून त्यामध्ये अभ्यासिकासह अनेक गोष्टीचा समावेश केला आहे. त्यामुळे या कार्यक्रमाचे प्रमुख वाल्मीक निकाळजे यांनी राम सातपुते यांच्या कामाचे विशेष कौतुक केले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Business dicker very informative articles or reviews at this time.