दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर मौजे अलंकापुरी येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन संपन्न….

माळशिरस (बारामती झटका)
महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेब, आरोग्यमंत्री डॉ. तानाजीराव सावंत साहेब, सोलापूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख तथा शिवसेनेचे शिवाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्याचे शिवसेनेचे प्रमुख राजकुमार हिवरकर पाटील हे तालुक्यामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आतापर्यंत खूप मोठ्या प्रमाणावर सामाजिक उपक्रम राबवले आहेत. यामध्ये आरोग्याचा विषय आहे. यामध्ये बचत गटातील महिलांची आरोग्य तपासणी असेल, तालुक्यातील पाच ते अठरा वयोगटातील विद्यार्थ्यांची तपासणी असेल, 99 हजार नागरिकांना शिवसेनेच्या वतीने सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिलेली डाळ असेल, अशा विविध उपक्रमांनी शिवसेना नेहमीच चर्चेत राहिलेली आहे.
दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर दहीगावमधील अलंकापुरी येथे शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटन दिमाखात पार पडले. यासाठी जिल्हा परिषद गटप्रमुख प्रमोद चिकणे, अध्यक्ष विजय ढेकळे, उपाध्यक्ष सागर वलेकर त्याचबरोबर गणेश गोपने, महेंद्र वलेकर, हर्षवर्धन देशमाने, ओंकार पुष्पे, ओंकार खिलारे, सचिन वलेकर, धुळदेव ओलेकर, आनंद वलेकर, किरण वलेकर, शंकर ओलेकर, शंकर काळे आदी शिवसैनिक उपस्थित होते. शाखेचा उद्घाटन सोहळा माळशिरस तालुक्याचे प्रमुख राजकुमार पाटील यांच्या हस्ते पार पडला. शिवसेनेच्या माध्यमातून जी विकासाची कामे, समाज उपक्रम समाजाला तालुक्यात दिसायला लागली, त्यालाच साथ घालत वेगवेगळ्या गावचे तरुण शिवसेनेकडे आकर्षित होताना दिसतात.


खऱ्या अर्थाने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला कानमंत्राप्रमाणे 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या पद्धतीने शिवसेनेचे काम चालू आहे. पण, माझ्या तालुक्यात शिवसेनेच्यावतीने शंभर टक्के समाजकारणाचे काम चालू आहे. त्यामुळे समाजातील युवक वर्गाला तालुक्यातील वेगवेगळ्या गावातून शिवसेनेची शाखा काढण्याकडे कल वाढलेला पाहून शिवसेना बळकट होत चालल्याचं चित्र पाहायला मिळते ते खूप महत्त्वाच आहे. आपण दहीगावसाठी ग्रामस्थांच्या मागणीवरून प्राथमिक आरोग्य केंद्र लवकरच मंजूरीसाठी सन्माननीय आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत साहेब यांच्याकडे जिल्ह्याची संपूर्ण प्रमुख शिवाजीराव सावंत साहेब यांच्या माध्यमातून प्रयत्न करून हा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढून माता, भगिनी, ज्येष्ठ नागरिक, नवजात मुला-मुलींच्या आरोग्याची सोय गावातच करण्याचा मानस आहे, असे राजकुमार हिवरकर पाटील यांनी सांगितले.
यावेळी तालुका प्रमुख राजकुमार घोरपडे पाटील यांनी अलंकापुरी दहिगाव शाखा अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच इतर पदाधिकारी व शिवसैनिक यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी दहिगाव जिल्हा परिषद गटप्रमुख श्री. प्रमोद चिकणे सर तसेच जिल्हाप्रमुख गटप्रमुख अनिल दडस साहेब, भाजपाचे सतीश आप्पा बरडकर तसेच परळी शहर शहराध्यक्ष आकाशजी खिलारे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.


नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.