माळशिरस बस स्थानकात दोन शिफ्टमध्ये वाहतूक नियंत्रण कक्ष सुरू ठेवण्याची मनसेची मागणी

माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस बस स्थानकात दोन शिफ्टमध्ये वाहतूक नियंत्रण कक्ष सुरू ठेवण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे माळशिरस शहराध्यक्ष किशोर सिद यांनी अकलूज आगार व्यवस्थापक प्रमोद शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी सोमनाथ वाघमोडे, अनिकेत काशीद, योगेश सुळे, धनाजी साठे, आजर तांबोळी आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.
सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे कि, माळशिरस हे तालुक्याचे ठिकाण असून खेड्यापाड्यातून शालेय विद्यार्थी, महिला, जेष्ठ नागरिक, अपंग हे येथे येत असतात. सायंकाळी सहा वाजलेनंतर संध्याकाळी आपले वाहतूक नियंत्रण कक्ष बंद ठेवल्याने तसेच आपल्या बस वेळेवर न आल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. बऱ्याच बस ह्या बसस्थानकामध्ये न येता बाहेरून जात असतात. रस्ता ओलांडताना अपघात झाला तर, याला अकलूज आगार व्यवस्थापक हे जबाबदार असतील.

माळशिरस बस स्थानकामध्ये दोन शिफ्टमध्ये वाहतूक नियंत्रण कक्ष सुरू न केल्यास आंदोलन केले जाईल, असा इशाराही यावेळी पदाधिकारी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.