ताज्या बातम्यासामाजिक

माळशिरसमधील लाईफ लाईन हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा अजब कारनामा…!

लोकांना आपल्या चार चाकी वाहनाने उडवून आपल्याच हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यासाठी डॉक्टरांची सुरू आहे जबरदस्ती.

माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस तालुक्याच्या ठिकाणी नामांकित असणारे लाईफ लाईन हॉस्पिटलचे डॉ. महादेव वाघमोडे यांनी माळशिरस येथील रहिवासी असलेले पत्रकार तानाजी वाघमोडे (व्यवसाय – मेडिकल) यांना दि.२८ फेब्रुवारी रोजी माळशिरस येथील आझाद कोल्ड्रिंक्सच्या समोर उभ्या असणाऱ्या दुचाकीला पाठीमागून आपल्या चार चाकी गाडीने जोरदार धडक दिली. या धडकेमध्ये तानाजी वाघमोडे खाली पडून त्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत तानाजी वाघमोडे यांनी माळशिरस पोलीस स्टेशनमध्ये डॉ. महादेव वाघमोडे यांच्या विरुद्ध भा.द.वि.मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम १८३,१८४,१२५ अ व २८१ अन्वये फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत सविस्तर हकीगत अशी की, फिर्यादी तानाजी वाघमोडे हे दि. २८ फेब्रुवारी रोजी सकाळी दहाच्या सुमारास आपल्या घरगुती कामानिमित्त बाहेर निघाले असताना आझाद कोल्ड्रिंक्स या ठिकाणी थांबले होते. त्यावेळी गाडी क्रमांक एम एच ४५ ए एल ७४४९ ही टाटा कंपनीची गाडी भरधाव वेगाने येऊन तानाजी वाघमोडे यांच्या दुचाकीला जोराची धडक मारली. या धडकेमध्ये तानाजी वाघमोडे व त्यांची दुचाकी रस्त्यावर पडली. त्यामध्ये त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यानंतर चार चाकी मालक डॉ. महादेव वाघमोडे यांनी स्वतःच्याच दवाखान्यामध्ये ॲडमीट करून घेऊन तुम्ही काळजी करू नका, असे सांगितले. नाहीतर तुम्ही कोणत्याही दवाखान्यात औषध उपचार घ्या. मी तुमच्या दवाखान्याचा सगळा उपचाराचा सर्व खर्च करतो असे सांगितले. परंतु त्यांनी अशा प्रकारची कोणतेही शब्द पुर्ण केलेले नाहीत. उलट लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर तानाजी वाघमोडे यांना जास्तच त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांनी दुस-या दवाखान्यामध्ये आपल्यावर उपचार केला. नंतर तानाजी वाघमोडे यांनी डॉ. महादेव वाघमोडे यांना वारंवार कॉल करून देखील डॉ. महादेव वाघमोडे यांनी तानाजी वाघमोडे यांच्या फोनला कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे लाईफ लाईन हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा हा अजब कारनामा आपल्या चार चाकी गाडीने लोकांना धडकवून आपल्याच दवाखान्यामध्ये दाखल करून घेऊन आपला दवाखाना चालवण्याचा हा नवीन उद्योग सुरू केला का ? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

अशा डॉक्टरांवरती योग्य ती कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी तानाजी वाघमोडे व त्यांच्या परिवारांनी केली आहे. यामध्ये पुढील तपास डीवायएसपी राहुल मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल सोनटक्के, पोलीस हेडकॉन्स्टेबल मोरे करीत आहेत.

डॉ. महादेव वाघमोडे यांच्या चार चाकी गाडीने माझे मोठे नुकसान झाले आहे. शारीरिक व आर्थिक नुकसान झाल्यामुळे मी महादेव वाघमोडे यांना वारंवार कॉल करून याबाबत विचारणा केली असता त्यांनी अरेरावेची भाषा वापरत माझ्या गाडीची सर्व कागदपत्रे आहेत, तुम्हाला काही करायचं ते करा. अशा प्रकारची भाषा एखाद्या डॉक्टरांनी वापरणे म्हणजे जणू काही त्यांना माणसं मारण्याची लायसन डॉक्टरांना मिळाले आहे का ? असा या निमित्ताने सवाल उपस्थित होतो आहे. अशा शिरजोरी करणाऱ्या डॉक्टरांविरुद्ध कडक कारवाई करून मला न्याय मिळावा, अशी माझी इच्छा आहे.
तानाजी वाघमोडे (पत्रकार)
रा. माळशिरस, जि. सोलापूर

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button