माळशिरसमध्ये रविवारी होम मिनिस्टर कार्यक्रम…
क्रांतीनाना मळेगावकर यांची उपस्थिती, ॲक्टीवा स्कूटीसह बक्षिसांचा खजिना
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस येथे रविवार दि. २१ जानेवारी २०२४ रोजी मकर संक्रांतीनिमित्त महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम व माळशिरस होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, अशी माहिती माळशिरस ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तुकाराम देशमुख व नगरपंचायतीचे नगरसेवक सचिन वावरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
माळशिरसमध्ये प्रथमच हा कार्यक्रम होत असून या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणून सिने अभिनेता क्रांती नाना मळेगावकर न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हे असणार आहेत. या कार्यक्रमात गप्पागोष्टी, रंजक खेळ, हिंदी, मराठी गाणे सोबत गावरान तडका असा बहादार कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात प्रथम येणाऱ्या महिलेस ॲक्टिवा स्कुटी भेट देण्यात येणार आहे. द्वितीय क्रमांकासाठी वॉशिंग मशीन, तृतीय क्रमांकासाठी एलईडी टीव्ही, चतुर्थ क्रमांकासाठी रेफ्रिजरेटर, पाचव्या क्रमांकासाठी पिठाची गिरणी, सहाव्या क्रमांकासाठी कुलर, सातव्या क्रमांकासाठी ओव्हन देण्यात येणार आहे. अशा आकर्षक बक्षिसांचा खजिना असणार आहे.
तर विजेता मानाच्या सात पैठणी तसेच उत्तेजनार्थ २१ पैठणीचे नग त्याचबरोबर लकी ड्रॉ विजेत्यास मिक्सर भेट २१ नग देण्यात येणार आहेत. सदर कार्यक्रमाचे आयोजन पंचायत समितीचे माजी सदस्य तुकाराम देशमुख व नगरसेवक सचिन वावरे यांनी केले असून वैशाली देशमुख, ताई वावरे, सुनीता देशमुख, दिपाली देशमुख, सारिका वावरे हे परिश्रम घेत आहेत. तरी या कार्यक्रमास महिलांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.