माळशिरस तालुक्याचा विश्वास – मा. आ. रामभाऊ सातपुते यांच्या नेतृत्वावर जनतेचा भरोसा – ॲड. प्रतीक जानकर

माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस तालुका नेहमीच राजकीयदृष्ट्या सजग राहिला आहे. शेतकरी, कामगार, तरुण आणि महिला या सर्व घटकांचा आवाज या भूमीतून बुलंद होत असतो. आता पुन्हा एकदा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात होत आहे. आणि या पार्श्वभूमीवर सर्वांच्या नजरा एका नावावर खिळल्या आहेत ते म्हणजे – मा. आ. रामभाऊ सातपुते.
लोकाभिमुख कामगिरीचा ठसा
रामभाऊ सातपुते यांनी गेल्या काही वर्षांत केवळ राजकारण नाही तर विकासाचा एक नवा अध्याय माळशिरस तालुक्यात लिहिला आहे. शेतकऱ्यांसाठी नीरा-देवधर योजनेचा पाठपुरावा असेल, माचणूर उपविभागाचा पाणीवाटपाचा विषय असेल, विजेचे डिपी जळालेनंतर ते तत्काळ बसवून देणे, रस्त्यांचे डांबरीकरण, गावगाड्यातील अंतर्गत रस्ते, महापुरुष, संत यांच्या स्मारकांची कामे अशी अनेक विकासकामे त्यांनी केलीत. लोकांची लाखो रुपयांची शस्त्रक्रिया मोफत करुन देणे, जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणे या सगळ्यामुळे जनतेत त्यांच्याविषयी एक विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.

तरुणाईचा प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील नवतरुण वर्गाला दिशा देणारा, सकारात्मक विचारांचा आणि नेतृत्वक्षम व्यक्तिमत्त्व म्हणून राम सातपुते यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. तरुणांना त्यांच्या उद्योगात मदत करणे, प्रोत्साहन देणे. तसेच क्रीडा-सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय सहभागी होणे, हे त्यांच्या कार्याचे खास वैशिष्ट्य आहे.
-जनता दरबार – समस्यांचे निराकारण
खुल्या जनता दरबाराच्या माध्यमातून जनतेला भेटून सर्वसामान्य लोकांचे प्रश्न तात्काळ जागेवरती सोडवणे हे रामभाऊंचं खास वैशिष्ट्य आहे.
जनता दरबाराच्या माध्यमातून त्यांनी “राजकारण म्हणजे सत्तेसाठी नव्हे तर समाजासाठी” हे दाखवून दिले आहे.
आगामी निवडणूक आणि जनता
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत जनतेला स्थिर, विकासाभिमुख आणि प्रामाणिक नेतृत्व हवे आहे. या सगळ्या गुणांचा संगम रामभाऊ सातपुते यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसतो. विरोधकांनी कितीही टीका केली, तरी जमिनीवरच्या कामाचा ठसा आणि जनतेचे त्यांच्यावरील प्रेम व विश्वास या गोष्टींमुळे त्यांची क्रेझ आज ही कायम आहे.

त्यामुळे माळशिरस तालुका आता नव्या दिशेने वाटचाल करीत आहे. गावागावातील जनता म्हणते,
“विकास हवा असेल तर राम सातपुतेच हवेत.”
या निवडणुकीत हा आवाज अधिक बुलंद होणार, याची चिन्हे आधीच दिसू लागली आहेत.
अॅड. प्रतिक सुनिल जानकर
एकशिव

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



