ताज्या बातम्याशैक्षणिक

माणकी गावात जिल्हा परिषद शाळेत शिक्षणाचा आईचा घो… अशी दुर्दैवी परिस्थिती झाली आहे…

माणकी (बारामती झटका)

शासनाचे जिल्हा परिषद शाळेत पट वाढविण्याकरता प्रयत्न सुरू आहेत. दिवसेंदिवस पालकांचा इंग्रजी माध्यमांकडे कल वाढत असतानासुद्धा माणकी व माणकी पंचक्रोशीतील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माणकी येथे आपले विद्यार्थी शाळेत पाठवत आहेत. सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची 103 पटसंख्या आहे. सदरच्या शाळेत गेल्या सहा वर्षापासून पहिली ते चौथीचे वर्ग तीनच शिक्षकांवरती सुरू आहे. मात्र, त्यामधील एक शिक्षक कमी होत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेतील मुलांनी शिकायचे कसे, असा प्रश्न निर्माण झालेला असल्याने माणकी जिल्हा परिषद शाळेत शिक्षणाचा आईचा घो… अशी दुर्दैवी परिस्थिती निर्माण झालेली आहे.

माणकी जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता व पटसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सदरच्या ठिकाणी चार शिक्षकांची आवश्यकता असताना तीनच शिक्षक पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन देत आहेत. अशा कठीण परिस्थितीत त्यामधील एक शिक्षक कमी होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे.

यासाठी सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे मॅडम, माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राऊत साहेब, माळशिरस पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी यांनी सदरच्या ठिकाणी दोन ऐवजी एकातरी शिक्षकाची तातडीने नेमणूक करून किंवा आहे हाच शिक्षक त्या ठिकाणी ठेवावा. अन्यथा माणकी गावचे नागरिक व शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक पंचायत समिती माळशिरस समोर आंदोलन करणार आहेत.

शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे, तरी प्रशासनाने दोन दिवसात शिक्षकांची व्यवस्था करावी, अशी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी पालक व ग्रामस्थ यांची मागणी आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button