माणकी येथे उप महाराष्ट्र केसरी पै. किरण भगत व पंजाब केसरी पै. हॅप्पी सिंग यांच्यात लढत होणार

श्री खंडोबा यात्रेनिमित्त भव्य निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानाचे आयोजन
माणकी (बारामती झटका)
माणकी ता. माळशिरस, येथे श्री खंडोबा यात्रेनिमित्त भव्य निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानाचे आयोजन सोमवार दि. १८/१२/२०२३ रोजी श्री खंडोबा मंदिर शेजारी, माणकी येथे करण्यात आले आहे. सदर मैदानाचे आयोजन सुग्रीव निंबाळकर जनरल मॅनेजर, पैलवान तानाजी रणनवरे सर, सुकुमार उर्फ किरण माने माजी डबल सरपंच माणकी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
सदर मैदानामध्ये गौतमआबा माने पाटील, पंचायत समिती सदस्य यांच्यातर्फे व कै. सजाई मल्हारी कर्णवर पाटील यांच्या स्मरणार्थ उपमहाराष्ट्र केसरी पै. किरण भगत व पंजाब केसरी पै. हॅप्पी सिंग यांच्यात लढत होणार आहे. डॉ. शिरीष शंकरराव रणनवरे व बाजीराव माने पाटील नूतन सरपंच कन्हेर यांच्यातर्फे महाराष्ट्र चॅम्पियन पै. संग्राम साळुंखे विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन पै. अनिल जाधव यांच्यात लढत होणार आहे. विजय गोरड माजी सरपंच, पै. गणेश कर्णवर महाराष्ट्र चॅम्पियन, बाळासाहेब गोरड सर माजी सरपंच यांच्यातर्फे पै. शुभम माने विरुद्ध पै. प्रदीप ठाकूर यांच्यात लढत होणार आहे. आप्पा शेंडगे पुजारी सरपंच रेडे, आबा साहेबराव गोरड युवा नेते, अशोक ठवरे युवा नेते यांच्यातर्फे पै. देवानंद पवार विरुद्ध पै. अमित सूळ यांच्यात लढत होणार आहे बाबासाहेब माने पाटील राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष, पांडुरंग तात्या पिसे विद्यमान सरपंच, खंडू तात्या कळसुले माजी चेअरमन यांच्यातर्फे पै. समाधान गोरड विरुद्ध पै. प्रताप ठाकूर यांच्यात लढत होणार आहे. विजय भाऊ तुपे श्रीनाथ ज्वेलर्स, शत्रुघ्न रणनवरे युवा नेते, विष्णू भाऊ गोरड माजी युवा सरपंच यांच्यातर्फे पै. पंकज पवार विरुद्ध पै. रोहित निटवे यांच्यात लढत होणार आहे.

यावेळी उद्घाटनाची कुस्ती सूर्या स्पोर्ट्स फाउंडेशन, कै. अण्णा उर्फ गेल केंगार यांच्या स्मरणार्थ पै. अर्जुन रणनवरे विरुद्ध पै. संग्राम मगर यांच्यात होणार असून विजेत्या पैलवानास ढाल देण्यात येणार आहे. यावेळी सत्कार मूर्ती पै. नामदेव कोकाटे इंटरनॅशनल शिवछत्रपती पुरस्कार विजेता प्राप्त २०२३, शंकरराव अनंता रणनवरे (सर), रणजीत युवराज रणनवरे (पीएसआय), हेमंत बाळासो रणनवरे (मुंबई पोलीस), सागर भारत कोकरे (महाराष्ट्र पोलीस) यांचा सत्कार संपन्न होणार आहे. तसेच मल्ल सम्राट रावसाहेब विठोबा मगर यांना सूर्या स्पोर्ट्स फाउंडेशन व खंडोबा कुस्ती कमिटी यांच्यातर्फे कुस्ती तपस्वी हा पुरस्कार देण्यात येणार आहे. सदर कुस्ती मैदानाचे समालोचन हनुमंत शेंडगे, मांडवे व परशुराम पवार, आटपाडी हे करणार आहेत. तरी जास्तीत जास्त मल्ल, वस्ताद, कुस्ती शौकीन यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.