मनसे धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढणार ?
अखेर बारामती झटका यांचे वृत्त खरे ठरले; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज ठाकरे यांच्यात उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या समवेत सकारात्मक बैठक संपन्न…
मुंबई (बारामती झटका) दै. एकमत साभार
लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष एकनाथ शिंदेंच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. म्हणजे राज ठाकरेंच्या मनसे पक्षाचा उमेदवार धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढू शकतो. मुंबईत राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठक झाली. ताज हॉटेलमध्ये पार पडलेल्या या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.
मुंबईत सध्या वेगवान घडामोडी घडत आहेत. मनसे आणि महायुतीमध्ये रोज बैठका होत आहेत. नुकतेच राज ठाकरे मंगळवारी दिल्ली दौ-यावर गेले होते. यावेळी त्यांनी विनोद तावडे तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. यावेळी राज ठाकरे यांच्यासह त्यांचे चिरंजीव अमित ठाकरेही उपस्थित होते. यादरम्यान काय चर्चा झाली याचा खुलासा दोन्ही पक्षांनी केला नव्हता. एक ते दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल असे सांगण्यात आले होते.
दिल्लीत राज ठाकरे आणि अमित शहा यांच्यात बैठक झाली. अमित ठाकरेही सोबत होते. महायुतीत सहभागी होण्यासंबंधी दोघांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. आणखी एका बैठकीनंतर यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. सध्या सकारात्मक चर्चा झाली इतकंच सांगू शकतो, अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली होती. लोकसभा निवडणूक असल्याने त्यासंदर्भातच चर्चा झाली. आम्ही कोणताही फॉर्म्युला दिलेला नाही, पण नेमक्या किती जागा मिळाव्यात ही भावना सांगितली आहे. भाजपाला सांगण्यता आले असून एक-दोन दिवसांत माहिती आल्यानंतर सविस्तर सांगू, असे बाळा नांदगावकर यांनी सांगितले होते.
मनसेला किती जागा मिळणार?
सूत्रांच्या माहितीनुसार, महायुतीमध्ये मनसेला लोकसभेच्या दोन जागा मिळण्याची शक्यता आहे. दक्षिण मुंबई आणि शिर्डी या दोन लोकसभेच्या जागा मनसेला दिल्या जाऊ शकतात. विशेष म्हणजे या निवडणुकीतून अमित ठाकरे रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. दक्षिण मुंबईतून तरुण आणि सुशिक्षित चेहरा असावा यासाठी अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवावी असा भाजपचा आग्रह आहे. तसे झाल्यास अमित ठाकरे निवडणूक लढताना दिसतील. दरम्यान शिर्डीमधून मनसेचे नेते बाळा नांदगावकर उमेदवार असू शकतील. पण दुसरीकडे भाजपा मनसेला एकच जागा देणार असल्याचीही सूत्रांची माहिती आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Wow, incredible blog structure! How long have you been running a blog for?
you made blogging look easy. The overall glance of your site is excellent, as smartly
as the content material! You can see similar here sklep internetowy