मांडकी येथे हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा शिवछत्रपती जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त होम मिनिस्टर, रक्तदान शिबीर, मोफत नेत्र तपासणी व डान्स स्पर्धेचे आयोजन

मांडकी (बारामती झटका)
मांडकी, ता. माळशिरस येथे हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा शिवछत्रपती जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन राजा शिवछत्रपती प्रतिष्ठान मांडकी यांच्या वतीने हनुमान मंदिरासमोर, मांडकी, ता. माळशिरस येथे करण्यात आले आहे. यंदाचे हे २६ वे वर्ष आहे.
यामध्ये बुधवार दि. २३/०४/२०२५ रोजी पासून भव्य ओपन हाफ पीच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दि. २८/४/२०२५ रोजी सकाळी ७ वाजता सर सेनापती संताजी घोरपडे समाधीपासून शिवज्योत आणण्यात येणार आहे. सायंकाळी ८ वा. होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या स्पर्धकास मानाची पैठणी व फेटा, द्वितीय क्रमांक डिनर सेट, तृतीय व चतुर्थ क्रमांक कप सेट व इतर सहा आकर्षक बक्षिसे असणार आहे.
तसेच मंगळवार दि. २९/०४/२०२५ रोजी सकाळी ९ वा. भव्य रक्तदान शिबीर व मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये डोळ्याचे ऑपरेशन व दवाखान्यात जाण्या-येण्याचा खर्च मोफत असणार आहे. तसेच सायंकाळी ७ वा. भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा 2025 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रथम पारितोषिक राहुल सुग्रीव रणनवरे महाराष्ट्र पोलीस, प्रशांत शहाजी रणनवरे, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर, हेमंत बाळासाहेब रणनवरे मुंबई पोलीस यांच्या वतीने रुपये ७००० असणार आहे. द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक भैय्या कदम शिवप्रेमी, चि. सागर व चि. सुमित राऊत, सूर्या फाउंडेशन मांडकी यांच्यावतीने ५००० रु. असणार आहे. तृतीय क्रमांकाचे पारितोषिक सदाशिव काशिनाथ निंबाळकर शिवप्रेमी, गणेश उत्तम निंबाळकर सिद्धनाथ कन्स्ट्रक्शन यांच्या वतीने रुपये ३००० असणार आहे.

या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी ८६००३८३०३१, ९१४६४५०४४९ या नंबर वर संपर्क साधावा. तरी या सर्व कार्यक्रमासाठी मांडकी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक राजा शिवछत्रपती प्रतिष्ठान, मांडकी यांच्यावतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.